लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णाला मोफत रक्त देण्याचा नियम असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) थॅलेसेमियाच्या १३ वर्षीय मुलीला पीआरसी रक्त न मिळाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटल गाठावे लागले. या प्रकरणाला घेऊन शहर युवक काँग्रेसच्या अल्पसंख्यक विभागाच्यावतीने अधिष्ठात्यांना निवेदन दिले. यात सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली.मिळालेल्या माहितीनुसार, मोमिनपुरा येथील रहिवासी थॅलेसेमिया रुग्ण मनतशा अन्सारी (१३) सोमवारी सकाळी ९ वाजता मेडिकलमध्ये दाखल झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत तिच्या रक्ताच्या नमुन्याला कुणीच घेऊन गेले नाही. त्यानंतर नातेवाईकांनी जेव्हा डॉक्टरांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, आमच्याकडे अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अॅसिड अॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान नाही. यामुळे जे रक्त उपलब्ध आहे त्यामुळे संक्रमणाची भीती आहे. शेवटी त्रासून रुग्णाचे नातेवाईक खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचे भाषा बोलून निघून गेले. रक्तासाठी पाच तासांची प्रतीक्षासूत्रानुसार, याच वॉर्डात भरती असलेला रामटेक येथील रहिवासी कलश काकणे (६) दुपारी १२ वाजेपासून रक्त लावण्यासाठी आला होता. परंतु डॉक्टरांनी सायंकाळी रक्त मिळेल, असे सांगून त्याला बसवून ठेवले होते. तसेच मध्य प्रदेश चिखली येथील सिकलसेल रुग्ण श्रेनू भोंडेकर (५) याला सायंकाळी ५ वाजता रक्त मिळणार असल्याचे सांगून थांबवून ठेवले होते. या सर्व रुग्णांना ‘बी पॉझिटिव्ह’ रक्ताची गरज होती. रुग्णाच्या नातेवाईकानुसार, रक्तासाठी संपूर्ण दिवस वाट पाहिल्यानंतरही अनेकवेळा रक्त मिळत नाही. काहीवेळा तर आठवड्यानंतरची तारीख दिली जाते.अधिष्ठात्यांना दिले निवेदनसिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्त मिळत नसल्याच्या विरोधात शहर युवक काँग्रेसचे अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष फजलूर रहमान कुरेशी यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना निवेदन सादर केले. यात त्यांनी रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली.चौकशी केली जाईलसिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णांनाच नाही तर इतर गंभीर रोगाच्या व शस्त्रक्रियेच्या रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. परंतु या प्रकरणात विना रक्त थॅलेसेमियाच्या रुग्णाला परत जावे लागले असेल तर याची चौकशी केली जाईल.-डॉ. संजय परातेविभागप्रमुख,रक्तपेढी मेडिकल
रक्ताविनाच परतावे लागले १३ वर्षीय थॅलेसेमियाच्या मुलीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:39 AM
सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णाला मोफत रक्त देण्याचा नियम असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) थॅलेसेमियाच्या १३ वर्षीय मुलीला पीआरसी रक्त न मिळाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटल गाठावे लागले. या प्रकरणाला घेऊन शहर युवक काँग्रेसच्या अल्पसंख्यक विभागाच्यावतीने अधिष्ठात्यांना निवेदन दिले.
ठळक मुद्देमेडिकल : रक्तासाठी रुग्णांवर तासन्तास प्रतीक्षा