शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

कोरोना काळात मलेरियाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:07 AM

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला असताना पूर्व विदर्भात मलेरियाच्या थैमानामुळे आरोग्याची स्थिती अधिक गंभीर ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला असताना पूर्व विदर्भात मलेरियाच्या थैमानामुळे आरोग्याची स्थिती अधिक गंभीर झाली. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये तब्बल १४६ टक्क्याने रुग्ण वाढले. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १६२ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात १५४ टक्के, भंडारा जिल्ह्यात ४० टक्के तर गोंदिया जिल्ह्यात २८ टक्क्याने वाढ झाली. केवळ नागपूर व वर्धा जिल्ह्यात रुग्णांत घट झाली. या वर्षी जूनपर्यंत १७६६ नव्या रुग्णांची नोंद झाली.

मलेरियाची लागण होणाºया जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचाही नंबर लागतो. ‘अ‍ॅनोफेलिस’ नावाचा डास चावल्यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. वाढती लोकसंख्या आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे मलेरिया पसरतो. जगात दरवर्षी ३० ते ५० कोटी नागरिकांना मलेरिया होतो. त्यापैकी हजारो नागरिक मृत्यूच्या खाईत ढकलले जातात. जगात प्रती ३० सेकंदांना एक बालक मलेरियाला बळी पडतो. पूर्व विदर्भातही मलेरियाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. २०१७ मध्ये ८४५९, २०१८ मध्ये ५८४६, २०१९मध्ये २८६५ तर २०२०मध्ये जवळपास अडीचपटीने म्हणजे, ७०५१ रुग्णांची नोंद झाली.

-गडचिरोली जिल्ह्यात ६४८५ रुग्ण

पूर्व विदर्भातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक मलेरियाचा रुग्णांची नोंद गडचिरोली जिल्ह्यात होते. २०१९ मध्ये या जिल्ह्यात २४७४ रुग्ण आढळून आले असताना २०२०मध्ये ६,४८५ रुग्णांची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यात २०१९ मध्ये २७० तर २०२० मध्ये ३४७, चंद्रपूर जिल्ह्यात २०१९मध्ये ७७ तर २०२०मध्ये १९६, भंडारा जिल्ह्यात २०१९मध्ये १० तर २०२० मध्ये १४ रुग्ण आढळून आले. या उलट नागपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये २८ तर २०२०मध्ये ९ तर वर्धा जिल्ह्यात २०१९मध्ये ६ तर २०२० मध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

- मागील सहा महिन्यात १७६६ रुग्ण

कोरोनाचा पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच जानेवारीपासून दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. सध्या ही लाट ओसरली असली तरी मलेरियाच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यात १७६६ रुग्ण आढळून आले. यात एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील १७०३, चंद्रपूर जिल्ह्यात ३४, गोंदिया जिल्ह्यात २५, नागपूर जिल्ह्यात ३, वर्धा जिल्ह्यात १ तर भंडारा जिल्ह्यात शुन्य मृत्यूची नोंद आहे.

-मागील तीन वर्षातील मलेरिया

जिल्हा :२०१८: २०१९ :२०२०

भंडारा :१७: १० :१४

गोंदिया :७०५: २७०: ३४७

चंद्रपूर :२५०: ७७: १९६

गडचिरोली:४७६१: २४७४: ६,४८५

नागपूर: ८८: २८: ०९

वर्धा :२५: ०६: ००

::जानेवारी ते जून या कालावधीतील मलेरिया

जिल्हा : रुग्ण

नागपूर : ०३

वर्धा : ०१

भंडारा : ००

गोंदिया : २५

चंद्रपूर : ३४

गडचिरोली : १७०३