१ जुलैला देशाचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिन व पुण्यतिथी असते. बिधानचंद्र रॉय सर्व उत्पन्न दान करीत होते. रॉय हे एक रोल मॉडेल आहेत. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात त्यांनी जखमी आणि पीडितांची नि:स्वार्थी भावनेने सेवा केली.
जगात शेतकरी आणि जवानांनंतर डॉक्टरांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्याविना समाजाची कल्पना अपूर्ण आहे. डॉक्टर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून परत आणतो. डॉक्टर आयुर्वेदिक, अॅलोपॅथी, युनानी आदी वेगवेगळ्या उपचार माध्यमातून रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करतो. जगात कोरोनासारख्या महामारीत डॉक्टर्स आपली भूमिका तत्परतेने पार पाडत आहेत. ‘थँक्यू डॉक्टर’ म्हणून डॉक्टरांना धन्यवाद दिले पाहिजे.
डॉक्टर समाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीत डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशसेवा केली आणि लाखो रुग्णांचा जीव वाचविला. कोविड-१९ जगासाठी एक संकटच आहे. या आजारातून रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी देशातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आहेत. संपूर्ण देशात त्यांनी एक टीमप्रमाणे काम केले आहे. कुणी आपल्या विचाराने आजाराशी लढण्याचे धोरण बनविले, तर कुणी सेवाभाव ठेवून काम केले तर कुणी समर्पण चेहरा बनून साहसाचे उदाहरण बनले. कोरोनाकाळात गंभीर रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला. डॉक्टरांचे अॅप्रॉन कोणत्याही सुपरहीरोच्या कॅपपेक्षा कमी नाही. या शहराच्या नि:स्वार्थ सेवेसाठी आम्ही डॉक्टारांचे आभार मानतो, असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.