शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

...म्हणून रामावर उपस्थित होतात प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:10 AM

आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत.

ठळक मुद्देदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत. त्यामुळेच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते रविवारी बोलत होते.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्षा व दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोह समितीच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सचिव वीरजेश उपाध्याय, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे प्रामुख्याने उपस्थित होते. दत्तोपंत ठेंगडी यांनी सामाजिक समरसतेचे स्वप्न दिले. त्यांनी दिलेले विचार आजदेखील तितकेच शाश्वत आहेत. बदलत्या काळात मूल्यांना कायम ठेवून विचारांची गती वाढविण्याची गरज आहे. दत्तोपंत ठेंगडी हे महान विचारक होते, परंतु विचारांच्या चौकटीत बंद नव्हते. त्यांच्यासारख्या महापुरुषांचे वचन व कर्म जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांचे व्यक्तित्व, कृतित्व व नेतृत्व समाजात प्रबोधित केले पाहिजे, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले. वीरजेश उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले. अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. तर अजय पत्की यांनी आभार मानले.

अयोध्या प्रकरणात चांगला निर्णय : जोशीअयोध्या प्रकरणात चांगला निर्णय झाला आहे. याचा लाभ सर्व देशाला मिळायला हवा. त्या आधारावर आता पुढे जायला हवे. मंदिर बांधण्यासंदर्भात ट्रस्ट पुढील प्रक्रिया ठरवेल असे डॉ.मुरली मनोहर जोशी म्हणाले. मथुरा आणि काशीसंदर्भात त्यांना विचारले असता तो मुद्दा आता कुणी उचलला आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ज्योती कलश यात्रेचे स्वागतदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी ज्योती कलश यात्रा रविवारी नागपुरात पोहोचली. आर्वीहून ही यात्रा निघाली होती. शिवाय ठेंगडी यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रप्रदर्शनीचेदेखील उद्घाटन झाले. संस्कार भारतीतर्फे हे प्रदर्शन साकारण्यात आले.

नेतृत्व करणाऱ्यांनी उपदेश कृतीत आणावा‘टीमवर्क’ करत असताना नेतृत्व करणाऱ्यांनी सर्वांसोबत एकत्रितपणे राहून काम केले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ते स्वत: इतरांना देत असलेला उपदेश अगोदर कृतीत आणण्याची आवश्यकता असते. जसे बोलले तसेच वागले पाहिजे. शिवाय कर्तृत्ववान व्यक्ती जोडण्याकडे कल असला पाहिजे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

मातृशक्तीशिवाय कुठलीही संघटना अपूर्ण : सुमित्रा महाजनसुमित्रा महाजन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अयोध्या प्रकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले. अखेर ‘रामलल्ला’ला स्वत:ची जागा मिळाली. याचे निश्चितच समाधान आहे. रामजन्मभूमीच्या एकूण लढ्यात महिलांचा मौलिक सहभाग होता. सामाजिक समरसतेशिवाय काहीच होऊ शकत नाही असे दत्तोपंत ठेंगडी मानायचे. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणेच त्यांना आदरांजली ठरेल. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत