नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली असून उद्या २५ मे रोजी दुपारी २ वाजता बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाईल.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) आयसीएसई आणि आयएससीच्या निकालानंतर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार, याकडे लागले होते. त्यांची प्रतीक्षा पूर्ण झाली असून गुरूवारी निकाल जाहीर होईल.
राज्य मंडळातर्फे यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा झाली. या परीक्षेसाठी राज्यातील १० हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत झाली असून या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीचा निकालही आता लवकरच जाहीर होईल.
- या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल- mahresult.nic.in- https://hsc.mahresults.org.in- http://hscresult.mkcl.org- https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board- https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023- http://mh12.abpmajha.com