नागपूर : रामझुल्यावर धनाड्य घरातील दोन महिलांनी नशेत वेगात कार चालवून दोन तरुणांना धडक दिली. यात त्यांचे निधन झाले. मात्र, या प्रकरण पोलीस आरोपींना संरक्षण देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करीत युवक काँग्रेसने गुरुवारी निदर्शने केली. यावेळी गृह विभागाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
या अपघातात मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया असे तरुणांना चे नाव आहे. या दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या दोन महिलांवर चार- पाच दिवस होऊनही कारवाई झालेली नाही. या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठ विविध शिष्टमंडळांनी पोलीस प्रशासनाची भेट घेतली. मात्र, त्यानंतरही काहीच हालचाली नाही. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, शहर अध्यक्ष तौसिफ़ खान यांच्या मार्गदर्शनात प्रदेश युवक काँग्रेस सचिव मोईस खान, सागर चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात स्वप्नील ढोके, अमन लुटे, कुणाल खडगी, संजू जवादे, सलीम शाह, शोएब अन्सारी, अभिषेक गाणार, अभिषेक डेंगरे, अरिफ खान, राहिल भगत आदींनी भाग घेतला.