शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बंदी असलेल्या पीओपी गणेश मूर्ती शहराबाहेर रोखणार

By गणेश हुड | Published: July 07, 2023 6:47 PM

Nagpur News यावर्षी नागपूर शहरामध्ये पीओपीच्या मूर्तींवर बंदी आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची कुठेही विक्री होऊ नये यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहे.  पीओपी मूर्ती दाखल होण्यापूर्वीच रोखण्यात येणार आहे. 

गणेश हूड नागपूर :  यावर्षी नागपूर शहरामध्ये पीओपीच्या मूर्तींवर बंदी आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची कुठेही विक्री होऊ नये यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहे.  पीओपी मूर्ती दाखल होण्यापूर्वीच रोखण्यात येणार आहे. 

 नियोजनासाठी मनपाने  शहरातील पारंपरिक मूर्तिकार संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमिवर शुक्रवारी  मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात  पोलिस प्रशासन, शहरातील मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक पोलिस आयुक्त नितीन जगताप, पोलिस निरीक्षक नरेंद्र वानखेडे, विभागीय अधिकारी (स्वच्छता) रोहिदास राठोड, यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर शहरात पीओपी मूर्तींची निर्मिती, विक्री आणि खरेदी यावर पूर्णत: बंदी असल्याची माहिती गजेंद्र महल्ले यांनी दिली. पीओपी मूर्तींची विक्री करणाऱ्यांवर मनपा पोलिस प्रशासन, शहरातील पारंपरिक मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कारवाई करणार आहे. पीओपी मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असून अशा मूर्ती शहरात येण्यापासून रोखण्याकरिता केंद्रीय समिती गठित केली जाणार आहे. पथक कारवाई करणारशहरात  पीओपी मूर्तींची विक्री आणि खरेदी टाळण्यासाठी शहरात  पथकाव्दारे कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये मूर्तिकार बांधवांची नोंदणी केली जाईल. नोंदणीसाठी मूर्तिकारांना १० ते १५ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये मनपाद्वारे गठीत मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीचे पथक नोंदणी अर्जांची छाणनी करेल व मूर्तिकाराच्या नोंदणीबाबत निर्णय घेईल. मूर्ती विक्रेत्यांकरिता देखील हिच प्रणाली वापरण्यात येणार असल्याचेही  गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव