शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगले; १८ महिन्यांत होणारे काम चार वर्षांनंतरही अर्धवट!

By गणेश हुड | Updated: November 19, 2022 13:25 IST

रस्त्याचे काम २५ टक्के तर पुलांच्या ७५ टक्के कामांना अद्यापही सुरुवात नाही

नागपूर : शहरातील नागरिकांना मोठमोठी स्वप्न दाखवून स्मार्ट सिटी प्रकल्पांचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात विकास तर दूरच आज या प्रकल्पाच्या अर्धवट कामांमुळे प्रकल्प परिसरातील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. १८ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याचे अपेक्षित असताना चार वर्षे झाली तरी या प्रकल्पांची कामे अर्धवट आहेत.

पूर्व नागपुरातील १७३० एकर परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्प उभारला जात आहे. ६५ कोटींचा हा प्रकल्प आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावा, यासाठी शापूरजी पालनजी कंपनीला काम देण्यात आले होते. मात्र, या कंपनीने काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असताना ४९ महिन्यांनंतरही एक तृतीयांश काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने या परिसरातील नागरिकांना खाचखळग्यातून धक्के' खावे लागत आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी प्रस्तावित घरकुलांचा प्रकल्पही रखडला आहे.

४९.७६ कि.मी. रस्त्यांपैकी फक्त १२.३६ कि.मी. रस्त्यांचे काम झाले आहे. तर २८ पुलांपैकी १० पुलांचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटीचा मोबदला व चुकीच्या आराखड्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. पारडी ते कळमना दरम्यान २४ मीटर रस्ता प्रस्तावित आहे. यामुळे ३०० घरे तुटणार आहे. काही रस्त्याखालून दूषित पाण्याची लाइन गेली आहे. अशा तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.

स्मार्ट सिटीतील प्रस्तावित विकास

पारडी, भरतवाडा, पुनापूर व भांडेवाडी भागाचा विकास, ५२ किलोमीटरचे रस्ते, इंटिग्रेटेड रोड, पाणीपुरवठा, सिवरेज, पावसाळी नाल्या, चांगल्या दर्जाची परिवहन सेवा, रस्ते विकास, उड्डापूल, स्मार्ट बस शेल्टर, शेअर बाईक, ई-रिक्षा, ऑटोमोटेड एमएलसीपी पारडी, होम स्वीट होम, स्मार्ट सिटी क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र, सार्वजनिक उद्यान, लॅन्ड स्केपिंग, कचरामुक्त शहर, स्मार्ट ट्रैश बीन, ग्रीन लाईट प्रकल्प, नागनदी सौदर्यीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सुरक्षा अॅप, कम्युनिटी क्लिनिक, ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टिम, पदपथ विकसित करणे, दहनघाट आदींचा समावेश आहे.

  • १० ऑगस्ट २०१८ रोजी कार्यादेश जारी करून शापूरजी पालनजी कंपनीला स्मार्ट सिटीतील ६५० कोटींचे काम दिले.
  • १८ महिन्यांत कंपनीने ४९.७६ कि.मी. लांबीचे रस्ते, २८ पूल व ४ जलकुंभांचे निर्माण अपेक्षित होते.
  • ४९ महिन्यांनंतरही १२.३६ कि.मी. लांबीचे रस्ते, १० पूल व ४ जलकुंभांचे काम अजूनही सुरु आहे. ४ काम अपूर्ण असतानाही कंपनीने ४४८.५८ कोटींच्या मोबदल्याची मागणी केली. परंतु संचालक मंडळाने १५.२५ कोटी मोबदला देण्याला सहमती दर्शविली.
  • पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा, भांडेवाडी परिसरातील १७३० एकर क्षेत्राचा प्रकल्पात समावेश आहे.
टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर