शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नौकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
2
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
3
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
4
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
5
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
6
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
7
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
8
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
9
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
10
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
11
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
12
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
13
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
14
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
15
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
16
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
17
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
18
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
19
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
20
IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 

बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे, केंद्राने पावले उचलावीत - सरसंघचालक मोहन भागवत

By योगेश पांडे | Published: August 15, 2024 12:19 PM

संघ मुख्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा...

नागपूर : बांगलादेशमधीलहिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण झाले पाहिजे. केंद्राने त्यांच्या पातळीवर पावले उचलावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्यांचा हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. भारताची परंपरा राहिली की आहे, आपण जगाच्या उपकाराकरता उभे राहतो. त्यामुळे आपण कधीच कोणावर आक्रमण केले नाही.जो संकटात होता त्याला मदतच केली. तो आपल्या सोबत कसा व्यवहार करतो हे बघितले नाही. जगभरातील पिडितांकरता आपण हे करतो. सरकार हे करत असते. शेजारील देशांमध्ये जी अस्थिरता आहे, त्यामुळे अनेकांना अराजकता झेलावी लागत आहे. त्या उत्पाताचा हिंदूंना त्रास होत आहे. त्यांना काही कष्ट होऊ नये, त्यांच्यावर काही अत्याचार होऊ नये, याची जबाबदारी एक देशाच्या नाते आपल्यावर आहेच. काही गोष्टी सरकारने आपल्या स्तरावरच कराव्या, असे सरसंघचालक म्हणाले. 

जगात अनेक लोक आहेत की ज्यांना अन्य देशांवर वर्चस्व गाजवायचे आहे. त्याकरता आपण सजग रहायचे आहे. आपल्यावर देशाच्या स्व ची रक्षा आणि स्वातंत्र्याची जबाबदारी आहे. त्यासाठी सामान्य समाजाने सुद्धा सजगता ठेवावी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तशी मनोवृत्ती ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

नवीन पिढीने स्वातंत्र्याची रक्षा करावी -केवळ चिंतन करून होत नाही. स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. १८५७ नंतर ९० वर्षाचा संघर्ष चालला. अनेक प्रकारचे लोक त्यात सहभागी झाले .आपल्या देशात प्रत्येक कोपऱ्यात स्वातंत्र्य नायक झाले. अगदी सामान्य व्यक्तीदेखील स्वातंत्र्याकरता रस्त्यावर उतरला. अनेकजण जेलमध्ये गेले अनेक अनेकांना अनेकदा कारावास झाला. बलिदान करणारा समूह आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा समाज यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आता येणाऱ्या पिढीला स्वतंत्रता   रक्षा करायची आहे, असे डॉ.भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndependence Dayस्वातंत्र्य दिनBangladeshबांगलादेशHinduहिंदू