शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
3
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
4
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
6
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
7
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
8
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
9
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
10
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
11
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
12
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
13
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
14
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
15
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
16
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
17
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
18
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
19
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
20
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप

महायुती समोर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठे मन करावे

By योगेश पांडे | Published: October 16, 2024 1:49 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष : भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने दोन गोष्टी अधिक मिळाव्यात

योगेश पांडे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांचा आवाका वाढला आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या पक्षाने जास्त जागा लढाव्या असे त्यांना वाटणे सहाजिकच आहे. परंतु आम्हालादेखील पक्ष सांभाळावा लागतो. संख्याबळ लक्षात घेता आम्हाला दोन गोष्टी जास्त मिळायला हव्या अशी आमची नेहमीच मागणी असते. महायुती समोर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठे मन करावे, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. नागपुरात बुधवारी ते प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते.

मागील निवडणूकीत उद्धव ठाकरेंनी शब्द फिरविला. मात्र शिंदे, अजित पवार हे मोठे मन करत आमच्यासोबत आले. कोणत्या पक्षाचा त्याग मोठा हे ठरवता येणार नाही. उगाच ताणतणाव करून निवडणूकीत पराभव पत्करणे हे कुणालाही परवडणार नाही. संख्या वाढविण्यासाठी कुणीही मतदारसंघ घेऊ नये, असे बावनकुळे म्हणाले.

एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्या पक्षाकडे जे मतदारसंघ आहेत तेथील जागांबाबत कुठलीही चर्चा भाजपने केलेली नाही. मात्र उर्वरित मतदारसंघात तीनही पक्ष चाचपणी करत आहेत. जो जिंकू शकेल त्यालाच ती जागा जाईल अशी सर्वांचीच भूमिका आहे. दोन तीन मतदारसंघात आमचे व राष्ट्रवादीचे उमेदवार तुल्यबळ आहेत. अशा ठिकाणी सारासार विचार करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाnagpurनागपूर