शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

तोच जोश.. तोच जल्लोष! लोकमत महामॅरेथॉनमध्ये दिसले फिटनेसचे रंग; धावपटूंचे जागोजागी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 10:56 AM

कुठे ढोल-ताशांचा गजर, कुठे बॅगपाइपर बॅण्डचा स्वर : पुष्पवर्षावर अन् झुंबा लेझीमच्या तालावर चेअरअप

नागपूर : 'लोकमत'च्या महामॅरेथॉनचा ज्वर मध्यरात्रीपासूनच शहराच्या विविध भागांत दिसायला लागला होता. धावपटूंच्या स्वागतासाठी चौकाचौकात कमानी उभारण्यात आल्या होत्या. महामॅरेथॉनच्या मार्गावरील स्वच्छतेसाठी महापालिकेचे कर्मचारी व्यस्त होते. महामॅरेथॉनच्या नियोजनातील सहकारी चुन्याने ट्रॅक आखत होते. जागोजागी पाण्याचे स्टॉल आणि खाद्य सामुग्रीचे स्टॉल सजविण्यात येत होते. पहाटेपहाटे धावपटूंच्या स्वागतासाठी, त्यांना चिअरअप करण्यासाठी शहरातील सखींचे ग्रुप, शालेय विद्यार्थ्यांच्या चमू वाद्य साहित्यासह व विविध पेहरावांमध्ये सज्ज होते. कस्तूरचंद पार्कवर जो उत्साह रविवारी पहाटे अनुभवायला मिळाला, तोच उत्साह धावपटूंच्या रनवेवरही ठिकठिकाणी बघायला मिळाला. रनवे दरम्यानच्या चौकाचौकात नृत्य, नाट्य, झुंबा, वाद्यांच्या सूर निनादायला लागले होते, याचा धावपटूनींही मनमुराद आनंद लुटला.

- ढोल-ताशा पथकाचा दणदणाट

महामॅरेथॉनची सुरुवातच ढोलताशांच्या तालावर झाली. पांढरेशुभ्र वस्त्र आणि भगवा फेटा बांधलेल्या शंभर कलावंतांनी वाद्यांचा दणदणाट करून वातावरणात उत्साहाची उब देत होते.

सेल्फी, फिनिशर पॉईंटवर स्पर्धकांची गर्दी

-लोकमत महामॅरेथॉनमध्ये कस्तुरचंद पार्कवर उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात चार सेल्फी पॉईंट ठेवण्यात आले होते. यात प्लास्टो, लोकमत, लोकमत समाचार आणि लोकमत टाईम्सच्या सेल्फी पॉईंटचा समावेश होता. या पॉईंटवर सेल्फी घेण्यासाठी स्पर्धकांनी एकच गर्दी केली. स्पर्धकांनी आपल्या कुटुंबासह या सेल्फी पॉईंटवर गर्दी करून मोबाईलमध्ये महामॅरेथॉनची आठवण टिपून घेतली. तसेच ३, ५, १० आणि २१ किलोमीटरच्या फिनिशर पॉईंटवरसुद्धा स्पर्धकांनी गर्दी करून लोकमतच्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचे छायाचित्रही आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. स्त्री, पुरुष, लहान मुलांसह वयोवृद्धांनीसुद्धा या फिनिशर आणि सेल्फी पॉईंटवर गर्दी केली होती.

- भोसला मिलिटरी स्कूलचा बॅगपाइपर बॅण्ड

धावपटूंचे स्वागत झाल्यानंतर रिझर्व बँकेजवळच भोसला मिलिटरी स्कूलच्या बॅगपाइपर वाजवित होते. या विद्यार्थ्यांची वेशभूषा आणि त्यांच्या शिस्तबद्ध वादनाने महामॅरेथॉनमध्ये चांगलीच रंगत आणली.

- आकाशवाणी चौक ते व्हीसीएदरम्यान ॲरोबिक आणि झुंबा

रिझर्व बॅंक मार्गाने निघालेल्या धावपटूंनी आकाशवाणी चौकातून स्पीड पकडली. त्यावेळी त्यांचे स्वागत विद्यार्थिनींनी लेझीमच्या गजरात केले. द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूरच्या विद्यार्थ्यांनी ॲरोबिक परफॉर्मन्स यावेळी केला. तर लेन्सन हॉस्पिटलच्या ग्रुपने झुंबा करीत उत्साह वाढविला.

- नृत्य, नाट्य आणि लेझीम

ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या चौकात धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी सेंट पॉल स्कूलच्या ३० विद्यार्थिनी नऊवारी घालून लेझीमच्या तालावर ठेका घेत होत्या. काही उत्साही धावपटूंनीही त्यांच्यासोबत ताल धरला तर ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूल, वर्धा रोडच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नुक्कड नाटक व नृत्याचे सादरीकरण केले.

- राही पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले चेअरअप

तिरपुडे कॉलेजच्या समोरून धावपटू मार्गस्थ होत असताना राही पब्लिक स्कूल, जयताळाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य करून धावपटूंना चेअरअप केले. देवयानी उमाळे यांच्या फालकॉन ग्रुपच्या महिलांनी इनकम टॅक्स ऑफिसच्या चौकात धावपटूंचा उत्साह वाढविला. माधुरी इंगळे यांच्या ग्रुपच्या महिलांनी पंजाबी पेहरावा करून फुटाळा तलावावर धावपटूंचे स्वागत केले. संगीता जाधव यांच्या ग्रुपने पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या महिला वारकरींची वेशभूषा करून डोक्यावर तुळशी वृंदावर घेऊन भजन गाऊन स्वागत केले. 

- नेल्सन हॉस्पिटलच्या फिजिओथेरपीस्ट विभागाने दिली सेवा

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या काही धावपटूंना स्नायूचे दुखणे उद्भवले त्यांच्या या वेदनावर ‘नेल्सन’ हॉस्पिटलच्या ‘फिजिओथेरपीस्ट’ विभागाने उपचाराची फुंकर मारत पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले. त्यांच्या कार्याचे धावपटूंनी कौतुक केले.

हॉस्पिटलच्या विभागाच्या प्रमुख डॉ. नेहा चौघरी यांच्या नेतृत्वात व मेघे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या हेल्थ केअरचे ‘सीओ’ डॉ. अनुप मरार यांच्या मार्गदर्शनात डॉ. सुनील कुमार भगत, डॉ. कांचन देशमुख, डॉ. एस. पी. राजन, डॉ. नीलेश भडके, डॉ. नीलेश दारवेकर, डॉ. अनुपमा भूते, डॉ. संदीप किरटवार, डॉ. पॉम्पी देवराव, डॉ. रितू दर्गन, डॉ. आनंद भुतडा व गणेश खरोडे यांच्यासह ८० परिचारिका व कर्मचाऱ्यांनी धावपटूंना सेवा दिली. कस्तुरचंद पार्कवरील मैदानात ‘फिजिओथेरपी’साठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला होता. २० बेडची सोय करण्यात आली होती. या शिवाय, धावण्याचा मार्गावरील विविध ठिकाणी सुद्धा डॉक्टरांचे पथक हजर होते. पाच तासांच्या कालावधीत शेकडो धावपटूंवर या डॉक्टरांनी उपचार केले. बहुसंख्य धावपटूंना स्नायूचे दुखणे उद्भवले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार करीत धावण्यापूर्वी काय काळजी घ्यावी,याचा सल्लाही ते देत होते. यावेळी शालिनीताई मेघे हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत गावंडे व अश्विन रडके यांनी ‘कार्डियाक ॲम्बुलन्स’ उपलब्ध करून दिली होती.

रस्त्याच्या दुतर्फा धावपटूंना प्रोत्साहन

वेळ सकाळी ६.१५ वाजताची. धावपटू आपल्या ट्रॅकवर आले. गर्दीच्या साक्षीने काउंटडाऊन सुरू झाले. पाहुण्यांच्या हस्ते हिरवी झेंडी देताच एका नव्या थराराला सुरुवात झाली. २१ किलोमीटरच्या मार्गावरील त्या नीरव शांतेत अबालवृद्धांपासून तरुण- तरुणींच्या ग्रुपने धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. स्पर्धेची रंगत, चुरस वाढविण्याकरिता नागपूरकर धावपटूंना प्रोत्साहित करीत होते. काही महिलांनी पारंपरिक वेशभूषेत रस्त्यावर उभे राहून धावपटूंचे स्वागत केले.

- हेल्मेट घालूनच डॉक्टर धावले

हेल्मेट नसल्यास ४५ किमी प्रतितासाच्या वेगाने चालणाऱ्या मोटरसायकलीवरून चालक खाली पडल्यास चारपट गतीने मार लागतो. यात डोक्याचे हाड तुटून मृत्यूचा धोका निर्माण होतो. रस्ता अपघातात हेल्मेटविना मृत्यू होणाऱ्यांमध्ये तरुण- तरुणींची संख्या अधिक आहे. म्हणूनच हेल्मेटच्या जनजागृतीसाठी स्वत: बधिरीकरण तज्ज्ञ असलेले डॉ. राजेंद्र रॉय हे हेल्मेट घालूनच ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावले. त्यांनी टी शर्टवर ‘हेल्मेट, सेव्ह लाइफ’चा संदेश असलेले स्टिकर चिकटविले होते. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी चेहऱ्यावर तिरंग्याचे रंग तर हातावर आणि दंडावर ‘लोकमत’ लिहिले होते.

- मेडिकलच्या भावी डॉक्टरांनी दिला अवयवदानाचा संदेश

अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकते, थांबलेले जगणे सुरू होऊ शकते. एक ‘ब्रेन डेड’ रुग्ण ११ जणांना जीवनदान देतो, तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व लोकांना कळण्यासाठी मेडिकलच्या भावी डॉक्टरांनी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होऊन अवयवदानाचा संदेश दिला. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये व डॉ. अविनाश गावंडे यांच्या नेतृत्वात हे विद्यार्थी धावले.

- तरुणांना भेटून केली वाहतूक नियमांची जनजागृती

७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. यासाठी वाहतूक नियमांच्या जनजागृतीचे व रस्ता वापरणाऱ्या घटकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. त्याच्या जनजागृतीसाठी नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह डॉ. प्रभात जैन व संजय दमानी हे ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झाले. त्यांनी येथे आलेल्या विशेषत: तरुणांना भेटून वाहतूक नियमांची जनजागृती केली.

‘सेव्ह सॉइल’साठी धावला राकेश

पारशिवनी तालुक्यातील पेंच नरेगाव खैरी येथील रहिवासी असलेला ३० वर्षीय युवक राकेश राऊत हैदराबादच्या आयटी कंपनीत नोकरी करतो. ‘सेव्ह सॉइल’ मोहिमेबद्दल समाजात जागृती निर्माण करण्यासाठी तो ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावला.

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर