शहरं
Join us  
Trending Stories
1
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
2
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
3
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
4
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
5
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
6
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
7
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
8
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
9
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
10
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
11
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
12
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
13
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
14
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
15
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
16
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
17
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
18
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
19
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
20
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!

राणांविरुद्धचे तक्रारकर्ते अडसूळ आयोगाचे अध्यक्ष, याचा अर्थ काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 11:14 AM

Nagpur : राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या; या पुनर्वसनात भविष्यातील संघर्ष दडला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी माजी खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती हा अमरावती व विदर्भाच्या राजकारणातील चर्चेचा नवा मुद्दा आहे. माजी खासदार नवनीत राणा यांच्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर पहिला आक्षेप अडसूळ यांनीच घेतला होता. तेव्हा, अडसूळ यांच्या पुनर्वसनात भविष्यातील संघर्ष दडला असल्याचे मानले जाते.

राज्य सरकारने सोमवारी अनुसूचित जाती-जमाती आयोगाची पुनर्रचना करताना अडसूळ यांना अध्यक्षपदी, तर नागपूरचे भाजप नेते अॅड. धर्मपाल मेश्राम यांना उपाध्यक्षपदी नियुक्त केले. पिंपरीचे गोरक्षक लोखंडे व पालघरच्या वैदेही वाढाण हे आयोगाचे अन्य दोन सदस्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडसूळ यांच्यासह छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट व हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. रामटेकचे कृपाल तुमाने व यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी यांच्याप्रमाणेच हेमंत पाटील या विद्यमान खासदारांचे तिकीट महायुतीमधील राजकारणात आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या सर्वेक्षणात कथितरीत्या अनुकूलता नसल्याने शिंदे यांना कापावे लागले होते. या तिघांचीही काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार तुमाने व गवळी यांना विधान परिषदेवर पाठविण्यात आले. आता हेमंत पाटील यांची वर्णी हळद संशोधन महामंडळाच्या अध्यक्षपदी लागली आहे. 

गेल्या एप्रिलच्या ४ तारखेला भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळाला. तथापि, हा निकाल असमाधानकारक असल्याचे सांगत आपण या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करणार असल्याचे महिनाभरापूर्वीच अडसूळ यांनी जाहीर केले आहे. तसे झाले, तर राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाची भूमिका निर्णायक ठरेल. अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ असतील, तर आयोग काय भूमिका घेईल, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज भासणार नाही.

 

 

  • विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना आनंदराव अडसूळ यांच्या नियुक्तीने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्याकडून आनंदराव अडसूळ पराभूत झाले, तेव्हापासून ते राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर प्रशासकीय व न्यायालयीन लढाई लढत आहेत. 
  • ही भानगड निस्तरण्यासाठीच दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष खासदार बनलेल्या नवनीत राणा भाजपच्या तंबूत गेल्या, असे मानले जाते. 
  • उच्च न्यायालयाने राणा यांच्याविरोधात निकाल दिल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. अडसूळ हे शिवसेनेचे नेते असूनही महायुतीत ते राणा यांच्याशी संघर्ष करीत राहिले.
टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाAnandrao Adsulआनंदराव अडसूळ