शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

अबब! हिवाळी अधिवेशनाचा खर्च पोहचला एक अब्जाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 9:47 PM

Nagpur News १९ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवरील खर्च यंदा ३० कोटींनी वाढला आहे.

ठळक मुद्देजीएसटीमुळे वाढ झाल्याचा तर्कखर्च ३० कोटींनी वाढला६८ वरून पोहोचला ९८ कोटींवर

नागपूर : १९ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवरील खर्च यंदा ३० कोटींनी वाढला आहे. २०१९मध्ये झालेल्या अधिवेशनाच्या तयारीवर एकूण ६८ कोटी रुपये खर्च झाले होते. यावर्षी ९८ कोटींवर खर्च येणार असल्याचा अंदाज व्यक्त करत मंजुरी मागण्यात आली आहे.

पीडब्ल्यूडीच्या अनावश्यक खर्चामुळेच हा खर्च वाढल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. केवळ दोन आठवड्यांच्या अधिवेशनासाठी इतका खर्च करणे तर्कसंगत नसल्याचेही म्हटले जात आहे. दुसरीकडे पीडब्ल्यूडीने जीएसटीमुळे खर्च वाढल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, २०१९मध्ये बांधकामावर असलेला १२ टक्के जीएसटी वाढून १८ टक्केवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे वस्तूंच्या दरातही वाढ झाल्याने खर्च वाढला आहे. दोन वर्षांपासून रंगरंगोटी झाली नसल्याने यावेळी एक कोट ऐवजी दोन कोट करावे लागतील.

राज्य सरकारने अद्याप वाढीव खर्चाला मंजुरी दिलेली नाही. अधीक्षक अभियंत्यांचा प्रस्ताव निर्णयार्थ आहे. याला लवकरच मंजुरी मिळेल, असा पीडब्ल्यूडीतील सूत्रांचा दावा आहे.

पडदे व चादरी बदलणार

पीडब्ल्यूडी डिव्हिजन १ चे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार यांनी सांगितले की, कोविड संक्रमण काळात आमदार निवासाचा वापर कोविड केअर सेंटर म्हणून करण्यात आला. रवी भवनातसुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. अशा परिस्थितीत येथील पडदे, चादरी, सोफा कवर, ब्लॅंकेट आदी बदलावे लागतील. तसेच सॅनिटायझेशनमुळे फर्निचरमध्ये डाग पडले आहेत. त्याला सुद्धा ठिक करावे लागणार आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन