शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

शिंदे-ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांची पळवापळवी; कार्यकर्त्यांना मात्र 'अच्छे दिन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 11:03 IST

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पक्ष प्रवेशाची तयारी

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचे समर्थक आपली शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे आता एकमेकांच्या कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. आधीच नागपुरात शिवसेनेचे नावापुरतेच होते. आता त्यातही दोन गट झाल्यामुळे रस्सीखेच वाढली असून यामुळे कार्यकर्त्यांना मात्र अच्छे दिन आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी २.३० वाजता माधवनगरातील खात रोड रेल्वे मैदानावर त्यांची जाहीर सभा आहे. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांची पूर्व विदर्भातील ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने ठाकरे गटातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना शिंदे गटात सामील करण्याची कसरत शिंदे गटाकडून सुरू आहे. शिवसैनिक हे स्वतःहून शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावाही शिंदे गटाकडून केला जात आहे.

शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह भेटले असता संविधान चौकात जल्लोष आयोजित करणारे शरद सरोदे यांना दोन दिवसांनी ठाकरे गटाकडून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नेमण्यात आले होते. याचा वचपा घेण्यासाठी ठाकरे गटातील युवा कार्यकर्त्यांना खेचण्याचे ऑपरेशन शिंटे गटाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव यांच्या माध्यमातून राबविण्यात आले.

नुकतेच हर्षल शिंदे (चंद्रपूर), शुभम नवले (नागपूर ग्रामीण), रोशन कळंबे (भंडारा), दीपक भारसाखरे (गडचिरोली) यांना शिंदे गटाकडून युवासेना जिल्हाप्रमुख नेमण्यात आले. याशिवाय प्रफुल्ल सरवान (चंद्रपूर), राज तांडेकर (नागपूर), लखन यादव (रामटेक) यांना जिल्हा समन्वयक नेमले. आता मोठ्या पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाची नजर आहे.

कार्यकर्त्यांना थेट नेत्यांचे फोन

आजवर शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांकडून नागपूर- विदर्भातील शिवसैनिकांची फारशी विचारपूस होत नव्हती. मोठे नेतेही फारसे फिरकत नव्हते. कार्यकर्ता मुंबईत गेला तरी कुणी वेळ देत नाही, ऐकून घेत नाही अशी ओरड होती. आता मात्र, दोन्ही गटांच्या बड्या नेत्यांकडून थेट कार्यकर्त्यांना फोन येऊ लागले आहेत. काही अडचण असेल तर भेटा, काम असेल तर सांगा, असा नेत्यांचा दिलासादायक सूर त्यांना ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे