गांधी कुटुंबीय स्वत:साठी जगले नाही, त्यांनी आधी देशाचा विचार केला

By कमलेश वानखेडे | Published: May 21, 2024 06:08 PM2024-05-21T18:08:19+5:302024-05-21T18:09:05+5:30

Nagpur : शहर काँग्रेसतर्फे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली

The Gandhi family did not live for themselves, they thought of the country first | गांधी कुटुंबीय स्वत:साठी जगले नाही, त्यांनी आधी देशाचा विचार केला

The Gandhi family did not live for themselves, they thought of the country first

नागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. त्या पाठोपाठ राजीव गांधी यांनीही देशासाठी प्राणाची आहुती दिली. गांधी कुटुंबीय कधीच स्वत:साठी जगले नाही. त्यांनी आधी देशाचा विचार केला. त्यामुळे आजही भारतीयांची त्यांच्यावर असीम श्रद्धा आहे, असे मत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.

नागपूर शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश महासचिव अतुल कोटेचा, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, डाॅ.गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, मिलींद दुपारे, महिला अध्यक्ष नंदा पराते, सेवादल अध्यक्ष प्रविण आगरे, संगीता वालदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी ईरानचे राष्ट्रपती इब्राहीम रईसी, राज्याचे माजी मंत्री खा.प्रतापराव भोसले, माजी महापौर कुंदाताई विजयकर यांचे पती अविनाश विजयकर, नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे महासचिव व नाटय समितीचे सचिव दिलीप ठाणेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत श्रधांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी महासचिव महेश श्रीवास, अण्णाजी राउत, अब्दुल नियाज नाजू, प्रकाश बांते,जाॅन थाॅमस, डाॅ.प्रकाश ढगे, मनोहर तांबुलकर, दिनेश तराळे, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेश पौनीकर, प्रविण गवरे, विश्वेश्वर अहिरकर, देवेंद्र रोटेले, गोपाल पटटम, ईरशाद मलिक, अब्दुल शकील, धरम पाटिल, मनीष उमरेडकर, राजेश परतेकी, रमेश राउत, परमेश्वर राउत, नंदा शेंडे, चिंतामन तिडके, रिना चव्हाण, रोशन बुधगवरे, माया घोरपडे, विजया ताजणे, योगिता मोडक, मंदा शेंडे, विजय वानखेडे, आप्पासाहेब मोहिते, आयुश काकाणी, सतीश तारेकर, भास्कर कोहाड, बबन दुरुगकर, कुमार बावनकर, अभिजीत ठाकरे, दिपक बुरडे, सुहास मानवटकर, रामभाउ कावडकर, निलेश नंदनकर आदी उपस्थित होते.

Web Title: The Gandhi family did not live for themselves, they thought of the country first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.