लाडकी बहीण योजना बंद करणार नाही; रक्कम वाढवून देणार
By कमलेश वानखेडे | Published: November 7, 2024 04:51 PM2024-11-07T16:51:15+5:302024-11-07T16:53:33+5:30
Nagpur : लोकसभेतील पराभवामुळे त्यांना लाडकी बहीण आठवली
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नोटवर्क
नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशी भिती महिलांना दाखविली जात आहे. पण आम्ही ही योजना बंद करणार नाही. तर सरकार आल्यास ही रक्कम वाढवून देऊ, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
पटोले म्हणाले, भाजपकडून लाडकी बहीण योजनेबाबत चुकीच्या जाहिरीती दिल्या जात आहेत. भाजप जवळ जाहिरातीसाठी भ्रष्टाचाराचा कमावलेल्या पैसा आहे. महाराष्ट्रात ६७ हजार महिला गायब झाल्या. अत्याचार झाले तरी कारवाई होत नाही. कोर्टाला स्वत:हून कारवाई करावी लागते. भाजपचे लोक महिलांबद्दल काय बोलतात ते पहा. लोकसभेतील पराभवामुळे त्यांना लाडकी बहीण आठवली, अशी टीका पटोले यांनी केली.
राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न
भाजप राहुल गांधी यांना घाबरलेला आहे. जनतेचा आवाज म्हणून ते भूमिका मांडत आहेत. लोकसभा अधिवेशनात मोदी सरकार अडचणीत येणार आहे. त्यामुळे खोट्या केसेसमध्ये राहुल गांधींना अडकवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. पण त्यांच्या केसालाही धक्का लावला तर भाजपच्या सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.