शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

खेळाडूंनी रेशीमबाग मैदानासाठी एनआयटी कार्यालयात केले आंदोलन

By मंगेश व्यवहारे | Published: December 27, 2023 2:28 PM

मैदान नाही खेळायला, अन् सरकार म्हणते खेलो इंडिया खेलो

नागपूर - रेशीमबाग मैदानातून अनेक दिग्गज खेळाडू तयार झाले आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत हे मैदान धार्मिक आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी वापरले जात आहे. त्यामुळे खेळाडूंना नियमित सराव करणे शक्य होत नाही. त्याचा परिणाम खेळाडूंच्या सरावावर होत असल्याने रेशीमबाग मैदान खेळासाठीच हवे, या मागणीसाठी ४०० ते ५०० खेळाडूंनी एनआयटीच्या कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून जोडे काढो आंदोलन केले.

रेशीमबाग मैदान हे नागपूर शहराच्या मध्य भागात असल्याने शहरातील खेळाडू व पोलिस प्रशिक्षणार्थी सकाळ ते संध्याकाळ येथे सराव करतात. या मैदानाचा हजारो गोरगरीब युवकांना पोलिस, सैन्यदलात व इतर शासकीय विभागांमध्ये नोकरी मिळण्याकरिता महत्त्वाचा वाटा आहे. मागील अनेक वर्षांपासून या मैदानाचा वापर मनोरंजक कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रमांसाठी सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी व खेळाडू विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामुळे अडथळा निर्माण होतो आहे. हे मैदान सीपी अँड बेरार कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल यांना लीजवर देण्यात आलेले आहे. पण ज्या कारणास्तव हे मैदान लीजवर देण्यात आले आहे, त्या कारणाच्या विपरीत उपयोग या मैदानाचा होत आहे.

खेळाडू विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे मैदान फक्त खेळाडू, पोलिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात यावे, अशी मागणी खेळाडूंनी केली. माजी नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने खेळाडूंनी एनआयटीच्या कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. खेळाडूंनी कार्यालयापुढे खेळाचे प्रात्यक्षिक केले. शेवटी जोडे काढून मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी देत असल्यामुळे निषेध केला.