शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

साठ्याच्या मर्यादेमुळे तूर व डाळीचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 8:51 PM

Nagpur News यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.

नागपूर : देशात मागील काही वर्षांपासून तूर डाळीचा वापर वाढला. सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणून या डाळीकडे पाहिले जाते. यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.

गेल्यावर्षी तूर डाळीचे दर दर्जानुसार ८५ ते ९८ रुपये किलो होते. यंदा दरात १५ टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झालेली आहे. आता भाव १०९ ते १२४ रुपये असून आठवड्यापूर्वी भाव ११३ ते १२९ रुपये किलो होते. दरवाढीला कृत्रिम टंचाईचा गंध आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर तूर डाळीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. केंद्राच्या आदेशानंतर प्रत्येक राज्य सरकारने डाळींचा काळाबाजार थांबविण्यासाठी आणि किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

तूरीवर आयात शुल्क शून्य!मोदी सरकारने संपूर्ण तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लागू केले होते. आता हे शुल्क पूर्णपणे समाप्त करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचे आदेश ३ मार्च २०२३ रोजी दिले. हे आदेश ४ मार्चपासून लागू झाले आहेत. त्यामुळे डाळीचे दर १५० रुपयांपर्यंत वाढण्याचे व्यापाऱ्यांचे संकेत फोल ठरले आहेत. शून्य आयात शुल्कामुळे तूर डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण आणि भाव घसरल्याने महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्पादन कमी; आयातही कमीचनागपुरात २५० पेक्षा जास्त दालमील असून उत्पादनासाठी तूरीची आवश्यकता असते. एरवी या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नसल्यामुळे काही मील बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नागपूर, लातूर, सोलापूर, जालना आणि अकोला तसेच कर्नाटकातील प्रमुख बाजारांतही तुरीची आवक खूपच कमी आहे. कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, सध्या तूरीचे दर दर्जानुसार ७७ ते ८४ रुपये किलो आहेत. आठवड्यापासून भाव ३ ते ४ रुपयांनी कमी झाले. आवक कमीच आहे. दररोज १६०० ते १८०० क्विंटल तूर येत आहे. गेल्यावर्षी याच काळात दररोज ४ हजार क्विंटलहून अधिक आवक होती.

टॅग्स :foodअन्न