शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पंतप्रधानांनी ढोल वाजवला अन् अमितचा आनंद गगनात मावेना! सांगितला पंतप्रधानांसोबतचा अनुभव...

By प्रविण खापरे | Published: December 11, 2022 5:31 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाद्य, यांचे एक अनोखे नाते आहे. देशभरात असो वा परदेशात, जिथे कुठे ते जातात आणि स्थानिक कलावंत वाद्यजंत्री वाजवताना दिसले की थांबतात, जवळून न्याहाळतात आणि वाद्ययंत्रावर हातही अजमावतात.

नागपूर :

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाद्य, यांचे एक अनोखे नाते आहे. देशभरात असो वा परदेशात, जिथे कुठे ते जातात आणि स्थानिक कलावंत वाद्यजंत्री वाजवताना दिसले की थांबतात, जवळून न्याहाळतात आणि वाद्ययंत्रावर हातही अजमावतात. रविवारी नागपुरातही त्यांना वाद्य वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था (एम्स)च्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्राचे परंपरागत वाद्य ढोल-ताशा मनसोक्त बडवला आणि ज्याचा ढोल बडवला, त्या अमित भेदेला एका क्षणात जगप्रसिद्ध करून सोडले. या क्षणाने अमित इतका गदगद झाला की त्याचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिहान परिसरातील एम्सच्या लोकार्पणाचा सोहळा रंगला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे-कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. पंतप्रधानांचे स्वागत गजवक्र ध्वज पथकाद्वारे महाराष्ट्राचे परंपरागत वाद्य ढोल ताशाने करण्यात आले. संगीतप्रेमी नरेंद्र मोदी यांनी थेट पथकात शिरून वाद्य आणि वादकांच्या वादनाचे निरीक्षण केले आणि तेथेच असलेल्या अमित भेदे यांच्याशी हितगूज करत ‘ये लकडी मुझे दोगे क्या’ असा सवाल केला.

अमितने तात्काळ ‘सर, ये लकडी नही टिपरू है’ असे उत्तर देत टिपरू मोदींच्या हातात दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिपराने, तर अमितने हाताच्या थापेने लयबद्ध ढोल बडवला. यावेळी मोदी स्वत:ही तालबद्ध संगीत संयोजनात विलीन झाल्याचे भासत होते. त्यानंतर त्यांनी प्रत्येक वादकांशी संवाद साधत प्रोत्साहन दिले. इतर मान्यवरांनीही वादकांचे कौतुक केले. या घटनेने मात्र अमित भेदे जगप्रसिद्ध झाला आणि त्याचे नातेवाईक, मित्र मंडळी साऱ्यांनीच त्यांचा हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर शेअर केला आहे. शहरातील अनेक राजकीय नेते मंडळींनीही अमितशी संवाद साधत भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अमितला हे वर्ष लाभले लकी- अमित भेदे हा २३ वर्षांचा असून त्याने याच वर्षी गणेशोत्सवात गजवक्र ध्वज पथकात वादन शिकण्याच्या हेतूने प्रवेश घेतला आणि त्यांच्या पहिल्याच वादनात त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतीने वादन करण्याची संधी लाभल्याचे पथकाचे प्रमुख प्रतीक चंबोळे यांनी सांगितले. हे वर्ष माझ्यासाठी लकी लाभल्याची भावना अमितने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी