शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पावसानं रडवलं, पीक सडवलं; ३५.२२ लाख हेक्टर शेती पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 9:49 AM

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापसाला सर्वाधिक फटका 

सुनील चरपे  नागपूर : मुसळधार व अति मुसळधार पावसामुळे, तसेच पुरामुळे जून ते १७ ऑक्टाेबर या काळात राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३८ लाख ४४ हजार ८२६ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे ३५,२१,८६८.४९ हेक्टरमधील विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक हातचे गेल्याने शेतकरी  हेलावून गेला आहे. सर्वाधिक फटका कापूस व साेयाबीनच्या पिकाला बसला असून, फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांचेही माेठे नुकसान झाले आहे. जून ते ३१ ऑगस्ट या काळातील भरपाईसाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे ४,६३४.४६ काेटींची मागणी केली आहे. 

काही जिल्ह्यांत गाेगलगायींचा प्रादुर्भाव झाला हाेता. यात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांसाेबत नागपूर व अमरावती जिल्ह्यांचाही समावेश आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करताना बीडच्या  १२,९५८ शेतकऱ्यांचे ३,८२२.३५ हेक्टर, लातूरमधील १,०८,६३६ शेतकऱ्यांचे ६८,३८५ हेक्टर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४०१ शेतकऱ्यांचे २८३.३३ हेक्टरमधील नुकसान झाल्याचे दाखविले आहे. बीड जिल्ह्यासाठी ५१९.८४ लाख, लातूरसाठी ९,३००.३६ लाख व उस्मानाबादसाठी ३८.६० लाखांची कृषी विभागाने मागणी केली. 

तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देशअतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. सततच्या पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असून, पावसामुळे मागील दोन ते तीन दिवसांत शेतीचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जून ते ऑगस्ट या काळातील नुकसानजून ते ३१ ऑगस्ट या काळात ३४ जिल्ह्यांमधील ३८,४४,८२६ शेतकऱ्यांचे ३१,७१,३३८.४९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. भरपाईसाठी ४,५३,५८८.८० लाखांची सरकारकडे मागणी केली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे ३०,१६,४४२ शेतकऱ्यांच्या २६,२१,६९२.१६ हेक्टरमधील तर पावसामुळे ८,२८,३८४ शेतकऱ्यांच्या ५,४९,६४६.३३ हेक्टर पीक नुकसानीचा समावेश आहे. भरपाईसाठी ३,७८,०१९ लाख तर पावसाने झालेल्या भरपाईसाठी ७५,५६९.४३ लाखांची मागणी केली आहे.

सप्टेंबर व ऑक्टाेबरमधील नुकसान१ ते ३० सप्टेंबर काळात पावसामुळे १२ जिल्ह्यांमधील ५२ तालुक्यांतील २,३७,४३४ हेक्टरमधील तर १ ते १७ ऑक्टाेबर या काळात १६ जिल्ह्यांमधील ५२ तालुक्यांमधील १,१३,०९१ हेक्टरमधील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस, साेयाबीन, मका या पिकांसह संत्रा, माेसंबी व केळी या फळपिकांचे झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी