शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर!

By नरेश डोंगरे | Published: November 30, 2023 2:47 PM

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी लालपरीवर आली आहे. त्यासंबंधाने 'ती' कामालाही लागली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात. यातील बहुतांश जणांची निवास व्यवस्था सिव्हील लाईन मधील सरकारी वसाहतीत केली जाते. अधिवेशनाच्या कामकाजाच्या निमित्ताने भल्या सकाळी ते विधानभवनात पोहचतात आणि काम संपल्यानंतर आपापल्या निवास व्यवस्थेच्या ठिकाणी जातात.

सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत हा क्रम सुरू असतो. यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असले तरी मंत्रालयातील विविध विभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वीच नागपुरात पोहचले आहेत. काहींचे आगमन सुरू आहे. त्यांनी आपापल्या विभागाच्या फाईल्स, कागदपत्रांचे गठ्ठेही आणले असून ते 'सेट' करण्याचे काम विधानभवनात सुरू झाले आहे. या सर्वांना निवास्थानाहून विधानभवनात आणण्याची आणि परत नेऊन सोडण्याची जबाबदारी एसटी महामंडळाच्या लालपरीवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, तूर्त ८ बसेस मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या सेवेत गुंतल्या आहेत. २६ नोव्हेंबरपासून त्यांची सेवा सुरू झाली असून, अधिवेशन संपण्यापर्यंत लालपरी ही जबाबदारी पार पाडणार आहे.

टॅग्स :state transportएसटीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन