शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
2
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
3
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
4
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
5
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
7
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
9
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
10
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
11
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
13
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
14
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
15
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
16
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
17
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
18
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
19
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
20
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!

नोकरानेच केला विश्वासघात, साथीदारांच्या मदतीने पळविली तिजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2023 7:51 PM

Nagpur News चोरट्यांनी एका डिस्ट्रीब्युटरच्या कार्यालयातून नोटांनी भरलेली तिजोरी घेऊन पळ काढल्याच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई, नेहरूनगरातील चोरीचा उलगडा

योगेश पांडे नागपूर : चोरट्यांनी एका डिस्ट्रीब्युटरच्या कार्यालयातून नोटांनी भरलेली तिजोरी घेऊन पळ काढल्याच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. संबंधित कार्यालयातील नोकरच या चोरीमागील सूत्रधार असून कर्जबाजारीपणातून सुटका करून घेण्यासाठी त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने १०.३८ लाख रुपयांची ही चोरी केली. गुन्हे शाखेने नोकरासह तीन आरोपींना अटक केली आहे. विवेक उर्फ सोनू भाऊराव इंगळे (२२, रामेश्वरी), ऋतिक अविनाश सोनावणे (२२, नवाबपुरा, महाल), रणजीत राठोड (३०, ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा) व सुलेश उर्फ गुड्डू बिसनलाल मस्करे (२२, खरसोली) अशी आरोपींची नावे आहेत. तर रोहीत चव्हाण (रमणा मारोती) हा पाचवा साथीदार फरार आहे.

प्रकाश रामदास कोहळे (४७) यांचे नेहरूनगर येथील ईटनकर भवनात पी. आर. ट्रेडर्स हे कार्यालय आहे. २५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यालयात काम करणारे राहुल मांगलकर यांनी सायंकाळी साडेसात वाजता कुलूप लावले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी लोखंडी चॅनेल गेटदेखील तोडले व लाकडी आलमारीचे कुलूप तोडण्यातदेखील ते यशस्वी झाले. मात्र, आलमारीमध्ये लोखंडाची तिजोरी होती व ती काही केल्या उघडत नव्हती. त्यात १०.३८ लाख रुपये रोख होती. अखेर चोरट्यांनी ती तिजोरीच घेऊन पळ काढला. हा प्रकार उघडकीस आल्यावर कोहळे यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडूनदेखील याचा तपास सुरू होता. सीसीटीव्हीत तीन आरोपी दिसून आले. पोलिसांना कार्यालयातील व्यक्तीवर संशय होता. सोनू सहा ते सात वर्षांपासून कोहळेंकडे काम करत होता. पोलिसांनी त्यालादेखील विचारणा केली. मात्र तो विश्वासार्ह असल्याचे कोहळेंनी सांगितल्यावर पोलिसांनी कठोर विचारणा केली नाही. परंतु इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून या प्रकरणात सोनूचा सहभाग असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. त्याआधारे गुन्हे शाखेने सोनूला ताब्यात घेतले. त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रोख ४.६० लाख तसेच तीन दुचाकी, चार मोबाईल फोन जप्त केले.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, निरंजना उमाळे, रविंद्र पानबुडे, मदनलाल मेश्राम, सुनिल ठवकर, निलेश ढोणे, सतिश ठाकरे, आशीष क्षीरसागर, संदीप मावलकर, महेश काटवले, लिलाधर भंडारकर, सत्येंद्र यादव, बलराम झाडोकर, पराग ढोक, मिथुन नाईक, शेखर राघोर्ते, अनंता क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कर्ज फेडण्यासाठी केला चोरीचा ‘प्लॅन’सोनू हा वसुलीची कामे करायचा व कार्यालयात मोठया प्रमाणात रोकड असते हे त्याला माहीती होते. त्याच्याकडे कार्यालयाची चाबीदेखील होती. घटनेच्या दोन आठवड्यांअगोदर सोनूला त्याचा मित्र रणजीत भेटला. रणजीतवरदेखील कर्ज होते. तेव्हा सोनूने कार्यालयात दररोज रोख पैसे असतात अशी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कार्यालयातून रक्कम चोरण्याचा ‘प्लॅन’ बनविला. सोनूनेच त्यांना चाबी उपलब्ध करून दिली होती. चोरी केल्यानंतर सुलेश याने त्याच्या दुचाकीवर दोन्ही आरोपींना आऊटर रिंगरोडला सोडले होते. त्यानंतर सुलेशने त्याच्या घरून कुदळ आणून तिजोरी फोडली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी