शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

नागपुरात ट्रॅव्हल्सचा वेग ठरतोय घातक, २४ तासांत दोघांचा मृत्यू

By योगेश पांडे | Published: October 04, 2023 4:35 PM

वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

नागपूर : वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर खाजगी ट्रॅव्हल्च्या बसेस नियमांचे उल्लंघन करत जाताना दिसून येतात. कारवाईचे प्रमाण नगण्य असल्यामुळे चालक आणखी शेफारतात व त्यातूनच अपघात होतात. २४ तासांत दोन बेदरकार ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन नागरिकांना प्राण गमवावे लागले. वाडी व सक्कदरदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात झाले असून वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर यातून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वाडी येथे अमरावती मार्गावरील भारत पेट्रोल पंपसमोर जितेंद्र रघुनाथ ठवरे (५३, मोठा इंदोरा, जरीपटका) हे पायी रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी एमएच ४० वाय ८२०० या क्रमांकाची बस वेगात आली. बसचालक शेख महमूद शेख वाहब (५५, कामगार कॉलनी, कपिलनगर) याचे बसवरील नियंत्रण सुटले व भरधाव बसने जितेंद्र यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसचालकाने बस थांबविण्याचेदेखील सौजन्य दाखविले नाही व तो बससह पसार झाला. या अपघातानंतर काही काळ घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. वाडी पोलीस ठाण्यातील पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी ट्रॅव्हल्सचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

दुसरा अपघात सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. मोठा ताजबाग परिसरातील न्यू सराय समोरील फुटपाथच्या बाजुला बसलेला एका युवकावर एपी २९ बीबी ४४३७ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स वेगाने धडकली. बस त्याच्या अंगावरून गेल्याने अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद जाकीर मोहम्मद युसूफ (४८, याकुबपुरा, हैदराबाद) हा ती बस चालवत होता. पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर