शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

शिक्षिकेला भोगावी लागत आहेत जात समितीच्या उदासीनतेची फळे, हायकोर्टाकडून गंभीर दखल

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 08, 2024 6:38 PM

Nagpur News: अमरावती येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हलबी-अनुसूचित जमातीच्या दाव्यावर गेल्या नऊ वर्षांपासून निर्णय न घेतल्यामुळे एका सहायक शिक्षिकेवर अधिसंख्य पदावर वर्ग होण्याची वेळ आली.

- राकेश घानोडेनागपूर  - अमरावती येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हलबी-अनुसूचित जमातीच्या दाव्यावर गेल्या नऊ वर्षांपासून निर्णय न घेतल्यामुळे एका सहायक शिक्षिकेवर अधिसंख्य पदावर वर्ग होण्याची वेळ आली. परिणामी, ती वेतनवाढ, पदोन्नती इत्यादी लाभांपासून वंचित झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन पडताळणी समितीला यावर येत्या २८ मार्चपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे.माधुरी पखाले, असे शिक्षिकेचे नाव असून त्या चंद्रपूर येथील राणी राजकुंवर भगिनी समाजाच्या शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अचलपूर उप-विभागीय अधिकाऱ्यांनी जारी केलेले हलबी-अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आहे. त्या आधारावर त्यांची ३० जून १९९८ रोजी अनुसूचित जमातीकरिता आरक्षित सहायक शिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यताही प्रदान केली होती.

त्यानंतर शाळेने त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळण्यासाठी ९ मार्च २०१५ रोजी संबंधित समितीकडे दावा दाखल केला. परंतु, जात प्रमाणपत्र फॉर्म-सी प्रकारात नसल्यामुळे समितीने त्यावर निर्णय घेण्यास नकार दिला. परिणामी, पखाले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने पखाले यांच्या दाव्यावर एक वर्षात निर्णय जाहीर करण्याचा आदेश देऊन ती याचिका निकाली काढली होती. असे असतानाही समितीने पखाले यांच्या दाव्यावर अद्याप निर्णय घेतला नाही. दरम्यान, अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना २१ ऑक्टोबर २०२० रोजी अधिसंख्य पदावर वर्ग केले गेले. परिणामी, पखाले यांनी दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राज्य सरकारलाही नोटीस जारीपखाले यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याच्या आदेशालाही या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यावेळी पखाले यांचे वकील ॲड. शैलेश नारनवरे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा दावा प्रलंबित असताना कर्मचाऱ्याला अधिसंख्य पदावर वर्ग करता येत नाही, या कायदेशीर मुद्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. करिता, न्यायालयाने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव व राणी राजकुंवर भगिनी समाज संस्थेचे अध्यक्ष यांनादेखील नोटीस बजावून उत्तर सादर करण्यास सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयTeacherशिक्षकnagpurनागपूर