योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी पकडलेले तीन आरोपी अट्टल चोरटे असल्याची बाब चौकशीतून समोर आली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.
२५ जुलै ते २७ जुलै दरम्यान गौतम मोहन खोब्रागडे (३०, त्रिशरण चौक, आंबेडकर चौक, वाडी) हे कुटुंबियांसोबत सासुरवाडीला गेले होते. अज्ञात चोरट्याने घर फोडून ८० हजारांहून अधिकचा मुद्देमाल लंपास केला होता. वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या माध्यमातून तपास सुरू केला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने हरजीतसिंग उर्फ गरम अजबसिंग गरेवाल (३२, जरीपटका, हुडको कॉलनी) याला ताब्यात घेतले. त्याने त्याचे साथीदार विक्की उर्फ चारी अरुण इंगळे (३०, सिरसपेठ) तसेच अमोल बोदेले (३४,कुशीनगर) यांच्यासोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींनी हुडकेश्वर व कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, जरीपटक्यातून वाहनचोरी केल्याचीदेखील माहिती दिली. आरोपींच्या ताब्यातून एमएच ४० डीपी ०२१६ तसेच एमएच ४९ बीई ३०९३ या दोन दुचाकी व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. हरजीतसिंग व विक्की हे अट्टल घरफोडे आहेत. तीनही आरोपींना वाडी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, रितेश तुमडाम, हेमंत लोनारे, सुशांत सोळंके, सुमित गुजर, मनोज टेकाम, प्रितम यादव, शंकर कांबळे, शरद चांभारे, रवी अहीर, योगेश सातपुते, कमलेश गहलोत, रविंद्र राऊत, कुणाल गेडाम यांच्या पथकाने ही कारवाई केली.