शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

अतिमहत्त्वाकांक्षेपोटी गेली आरटीओ इन्स्पेक्टर गीता शेजवळ यांची विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2023 9:39 PM

Nagpur News अतिमहत्त्वाकांक्षा बाळगून कुणी काम करीत असेल तर त्या व्यक्तीच्या हातून सगळेच जाते. परिवहन विभागात सतत चर्चेत राहणाऱ्या आरटीओ इन्स्पेक्टर गीता शेजवळ यांच्याबाबत असेच झाले.

नरेश डोंगरे नागपूर : अतिमहत्त्वाकांक्षा नेहमीच नडते. सारे काही सुरळीत असताना हेही पाहिजे, तेही हवे अन् सारेच्या सारेच हातात हवे, अशी अतिमहत्त्वाकांक्षा बाळगून कुणी काम करीत असेल तर त्या व्यक्तीच्या हातून सगळेच जाते. परिवहन विभागात सतत चर्चेत राहणाऱ्या आरटीओ इन्स्पेक्टर गीता शेजवळ यांच्याबाबत असेच झाले.

गुरुवारी रात्री त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) विकेट घेतली. शेजवळ यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ तसा वादग्रस्तच आहे. त्यांच्यासाठी तक्रारी, चाैकशी अन् गुन्हे दाखल होणेसुद्धा नवीन नाही. मात्र, वरपर्यंत सेटिंग असल्याने हे सर्व होऊनही त्या बिनधास्त वावरत होत्या. आरटीओतील सर्वात दबंग महिला अधिकारी म्हणूनही त्या ओळखल्या जातात. रस्त्यावर ऑन ड्युटी असताना त्यांचे वर्तन, त्यांची भाषा ‘घाट घाट का पाणी पिणाऱ्या ट्रकचालकाची’ही बोलती बंद करणारी होती. ज्या ठिकाणी त्यांची ड्युटी असायची, तेथे त्यांच्या मर्जीतील काही खासगी इसमांची पठाणी वसुलीही अवघ्या आरटीओत चर्चेला येत होती.

अशी पार्श्वभूमी असताना, गेल्या चार महिन्यांपूर्वी त्या आक्रमकपणे चर्चेत आल्या. एका अधिकाऱ्याला टार्गेट केल्याने नागपूर-विदर्भाच्या आरटीओतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी फळी त्यांच्या विरोधात गेली. त्यानंतरही त्यांची आक्रमकता तशीच राहिल्याने त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ फेब्रुवारीला लाच घेताना अटक केली. या प्रकरणानंतर आरटीओच्या दोन गटात मुंबई-पुण्यातील काही जणांनी मांडवली करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही दिवसांसाठी त्या बॅकफूटवर गेल्या. मात्र, नंतर पुन्हा त्यांनी खाडे नामक निवृत्त अधिकाऱ्याच्या साथीने नागपूर, विदर्भातील बदलीचे रॅकेट विस्तारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ‘लोकमत’ने हे प्रकरण उघड करून राज्यभर खळबळ उडवून दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधाने आरटीओतील बदल्या ऑनलाईन करण्याचे परिपत्रकच काढण्याचे आदेश दिले. तर, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चाैकशी एसआयटीकडे सोपविली. हे सर्व सुरू असताना आरटीओच्या ‘रामटेकच्या गडा’सह सर्व चेक पोस्टवर होणारी रोजची ‘लाखोंची एन्ट्री’ तसेच रेती, गिट्टी, मुरूम, ओव्हरलोडचा ताबा घेण्यासाठी दलाल कामी लागले अन् १ मेपासून बिनधास्त वसुल्या सुरू झाल्या. त्याचवेळी शेजवळ यांची विकेट जाणार असल्याची चर्चा रंगली अन् गुरुवारी ती खरी ठरली.

करोडोचा मामला, चारशेत निपटला

आरटीओत महिन्याला कोट्यवधीची एन्ट्री जमा होते, असे संबंधित सांगतात. दबंग शेजवळ यांची विकेट मात्र चारशे रुपयांसाठी गेली. लातूरच्या ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर एसीबीने व्हॉईस रेकॉर्डिंग केले अन् शेजवळ अडकल्या.

पर्स, गणवेष, पैसे सोडून काढला पळएसीबीचा ट्रॅप झाल्याचे लक्षात येताच कांद्री बॉर्डर चेक पोस्टवरील कार्यालयातून शेजवळ गायब झाल्या. त्यांनी आपला शासकीय गणवेष, पर्स अन् पैसेही तेथेच ठेवून पळ काढला. शेजवळ यांच्यावरील ट्रॅपने केवळ नागपूर-विदर्भ नव्हे तर राज्यभरातील आरटीओत प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसCrime Newsगुन्हेगारी