नागपूरमध्ये सध्या राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी मुंबईकरांना दर्जेदार आणि अद्ययावत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. लवकरच यासंदर्भात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ, या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
नागपूरमध्ये सुरु असलेल्या या अधिवेशनात नुकताच फिफा विश्वचषक जिंकलेल्या अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचा देखील विषय निघाला. सभागृहाचं कामकाज समजवून घेण्याच्या उद्देशाने सभागृहात आलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी मार्गदर्शन केलं. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यास वर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन झाले.
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचं महत्त्व समजावून सांगताना फुटबॉल विश्वचषकामधील मेसीच्या खेळाचं उदाहरण दिलं. उदाहरण द्याचं झालं तर परवा आपण जो काही फुटबॉल विश्वचषकाचा सामना पाहिला तर त्याच्यामध्ये मेस्सीला आपण पाहिलं. मेस्सीने तर कमाल केली. हा मेस्सी काय एका दिवसात घडलेला नाही. अर्जेंटिनाचा जग्गजेता संघ उभा करण्यामागे जिद्द, चिकाटी, मेहनत अशा सगळ्याच गोष्टी असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.