शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पावसाच्या ‘यलो अलर्ट’ने वाढली क्रिकेटप्रेमींच्या हृदयाची धडधड; टी-ट्वेंटी सामन्यावर पावसाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 10:52 PM

Nagpur News २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.  त्यामुळे नागपुरात होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार की नाही म्हणून क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.

ठळक मुद्दे२१ ते २३ पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाजतीन वर्षांनंतर होतो आंतरराष्ट्रीय सामना

 

नागपूर : येत्या २३ सप्टेंबर रोजी जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-ट्वेंटी सामना आयोजित करण्यात आला आहे; परंतु याच दम्यान हवामान विभागाने २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.  त्यामुळे जवळपास तीन वर्षांनंतर नागपुरात होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार की नाही म्हणून क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.

नागपुरात जवळपास तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये मोठा उत्साह आहे. रविवारी काही मिनिटातच ऑनलाइन तिकीट विकल्या गेले. सोमवारी तिकीट बुक करणाऱ्या क्रिकेटप्रेमींची मोठी रांग सिव्हिल लाइन्स येथील व्हीसीएवर पाहायला मिळाली. ज्या लोकांनी ऑनलाइन तिकीट बुकिंग केली होती, त्यांनी आज प्रत्यक्ष व्हीसीएवर जाऊन काउंटरवरून तिकीट मिळवली. नागपुरात १० नोव्हेंबर २०१९ रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-ट्वेंटी सामना खेळला गेला होता. त्यानंतर कोविडचे संकट आले. कोविडनंतर नागपुरात होत असलेल्या या सामन्याबाबत विशेष उत्साह आहे.

- व्हीसीएने काढला ५ कोटींचा विमा

व्हीसीएने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याचा ५ कोटी रुपयांचा विमा काढला आहे. जर सामना पावसामुळे एकही चेंडू न फेकता रद्द केला जाईल तर व्हीसीएला संबंधित रक्कम विमा कंपनीमार्फत मिळेल. जर सामन्यादरम्यान एकही चेंडू टाकला गेला तर विमा कंपनीकडून कुठलीही नुकसानभरपाई मिळणार नाही. सामना रद्द झाला तर तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकांना तिकिटाची रक्कम परत केली जाईल.

- मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर-पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्रासह सायक्लोनिक सर्क्लुलेशन तयार झाले आहे. येत्या २४ तासांत ते उत्तर पश्चिमच्या दिशेने पुढे सरकेल. ओडीशा, छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये पोहोचेल. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असले तरी अनेकदा अलर्ट अपयशीसुद्धा ठरले आहेत. नागपुरात सोमवारी आकाशात ढग दाटून आले होते. मंगळवारीसुद्धा काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Vidarbha Cricket Associationविदर्भ क्रिकेट असोसिएशनVidarbha Cricket Association, Jamthaविदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठा