नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फॅन्स असोसिएशनअंतर्गत क्रिएटिव्ह थिएटर ग्रुपच्या वतीने जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉ. मुकेश गजभिये, सचिव सुनील डोंगरे यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते.
----------
वेडिंग इंडस्ट्री वाचविण्यासाठी आंदोलन
नागपूर : संविधान चौक येथे टाळेबंदीचे निर्बंध हटवा आणि वेडिंग इंडस्ट्री वाचवा असे आंदोलन करण्यात आले. टाळेबंदीच्या निर्बंधामुळे गेल्या वर्षभरापासून बॅण्ड, डेकोरेशन, कॅटरिंग, फोटाेग्राफर, व्हिडिओ शुटिंग, लायटिंग, पार्लर आदींचा व्यवसाय चौपट झाला आहे. १ एप्रिलपासून किमान २०० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पाडावे आणि वेडिंग इण्डस्ट्रीला उभार द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
----------------
मानवधर्म जागृती मिशनतर्फे पर्यावरणपूरक होळी ()
नागपूर : मानवधर्म जागृती मिशनच्या वतीने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. यावेळी अजनी चौक येथील हनुमान मंदिर येथे मिष्टान्नासोबतच मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले आणि देहदानाचा संकल्प नागरिकांकडून करवून घेतला. याप्रसंगी डॉ. कविता ढोबळे-भोंडगे, डॉ. आनंद ढोबळे, निखिल ढोबळे, अमोल सेवक, हर्षल तलमले उपस्थित होते.
.............