खापरखेडा : चाेरट्याने विटा तयार करण्याच्या शेडमध्ये प्रवेश करीत तेथील मशीनचे सुटे भाग काढून ते चाेरून नेले. त्या सुट्या भागाची एकूण किंमत १ लाख ५३ हजार रुपये आहे. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना संगम शिवारात नुकतीच घडली.
अक्षय जयप्रकाश सहजरामानी (३२, रा. जरीपटका, नागपूर) यांची बिना संगम (ता. कामठी) शिवारात विटांची भट्टी असून, तेथील शेडमध्ये विटा तयार केल्या जातात. दरम्यान, काही दिवसापूर्वी तिथे कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने त्या शेडमध्ये प्रवेश केला. यात त्याने तीन अश्वशक्ती क्षमतेच्या मशीनचे केबल कापले तसेच त्या मशीनमधीलल सुटे भाग काढून चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच अक्षय सहजरामानी यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या सुट्या भागाची एकूण किंमत १ लाख ५३ हजार रुपये असल्याचेही त्यांनी पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक निमगडे करीत आहेत.