लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जसजसे कोरोना संक्रमितांचे आकडे वाढत जात आहेत, तसतसे प्रशासकीय यंत्रणेच्या दुरवस्थेचे धिंडवडेही पुढे यायला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांचे साहित्यच चोरीला जात असल्याचे प्रकरण पुढे येत आहे. याबाबतीत तक्रार करूनही यंत्रणा मूग गिळून बसलेली असल्याचे स्पष्ट होत आहे.दोनच दिवसांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला मेडिकलमधून हलविण्यात आल्याचा प्रकार पुढे आला होता. त्याबाबतच्या स्पष्टीकरणात कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून त्यास विधिवत यंत्रणेद्वारेच भरती होण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात आल्याची बोळवण करण्यात आली होती. संसर्गाच्या धास्तीनेच सर्वसामान्य माणूस हादरलेला असताना कर्तव्य सोडून रुग्णास संभ्रमित करण्याचाच हा प्रकार होता. या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमधून रुग्णाचे साहित्यच चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी व मित्र परिवाराने याबाबत वारंवार विचारणा करूनही कर्तव्यावर असलेल्या संबंधित यंत्रणेने टाळाटाळ केल्याने रुग्ण व रुग्णाचे संबंधित भयभरत झाले आहे. सोमवारी कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दुसऱ्या माळ्यावर हा रुग्ण उपचार घेत आहे. त्याअनुषंगाने रुग्णाने आपल्या भावास डॉक्टरांच्या परवानगीनेच फळ आणि विटॅमिन्स प्रदान करणारे ड्रायफ्रूट्स, पेंडखजूर आणण्यास सांगितले होते. त्याअनुषंगाने भावाने ते सुरक्षा गार्ड असतात तेथे पोहोचवून ते रुग्णास देण्यास सांगितले. मात्र, तीन दिवस होऊनही ते साहित्य रुग्णापर्यंत पोहोचलेले नाही. पॉझिटिव्ह असल्याने आता बराच काळ कोविड हॉस्पिटलमध्ये घालवावा लागणार असल्याने दुसºया दिवशी मंगळवारी रुग्णाने भावाकरवी नवे कपडे खरेदी करून आणण्यास सांगितले. ते कपडे भावाने सुरक्षा गाडर््सकडे सोपवले. मात्र, ते कपडेही रुग्णापर्यंत पोहोचलेले नाही. याबाबतीत सुरक्षा गाडर््सना विचारणा केली असता शिफ्ट बदलली, दुसरा माणूस होता, कशाला हवेत कपडे वगैरे उडवाउडवीची उत्तरे देऊन भावाला हाकलून लावण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय, रुग्णाचे अन्य साहित्यही गायब करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अशाप्रकारे रुग्णांची गैरसोय होत असेल तर कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्न रुग्णांना पडला आहे.गरीब रुग्णांची तर वाताहतचमाझे साहित्य, कपडे व विटॅमिन्स माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत, याचा अर्थ ते गायब झाले किंवा चोरी गेले असाच होतो. माझी स्थिती सर्वसाधारण असल्याने त्याचा मला तेवढा फरक पडणार नाही. मात्र, गरीब रुग्णांच्या बाबतीत होत असेल तर कठीण आहे. आधीच कोरोनाच्या संसर्गाने रुग्ण घाबरलेला असतो आणि अशात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच असा प्रकार घडत असेल तर रुग्णाने कुणाकडे बघावे, असा सवाल संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाने ‘लोकमत’कडे उपस्थित केला आहे.दोन दिवसांपूर्वीही रुग्णाला हाकलले होतेसोमवारीच एका अन्य पॉझिटिव्ह रुग्णाला मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमधून हाकलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. खासगी तपासणीतून पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन संबंधित रुग्ण तात्काळ मेडिकलला पोहोचला होता. त्यावर मनपाची परवानगी घेऊन या, असे सांगून त्यास हाकलण्यात आले होते. तरीदेखील तो रुग्ण तापाने फणफणत दीड तास उन्हातच उभा होता. अखेर काही समाजसेवकांच्या मदतीने तब्बल पाच तासांनंतर त्यास भरती करण्यात आले होते.
नागपुरात कोविड हॉस्पिटलमधून रुग्णांचे साहित्य चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 1:09 AM
जसजसे कोरोना संक्रमितांचे आकडे वाढत जात आहेत, तसतसे प्रशासकीय यंत्रणेच्या दुरवस्थेचे धिंडवडेही पुढे यायला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांचे साहित्यच चोरीला जात असल्याचे प्रकरण पुढे येत आहे. याबाबतीत तक्रार करूनही यंत्रणा मूग गिळून बसलेली असल्याचे स्पष्ट होत आहे.
ठळक मुद्देमेडिकलमधील प्रकार : खासगी वस्तू केल्या जात आहेत गायबविचारणा केल्यास केली जातेय अरेरावी