लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने हत्या करण्यात आली असल्यायाची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. महागाई व कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरील चर्चेत बोलतांना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल केला.ते म्हणाले, एका विशिष्ट कट्टरवादी विचारांनी प्रेरित काही संघटना राज्यात आणि देशात कार्यरत आहेत. देशभरात सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या करण्यात आली. ती हत्या एका विचारांनी भारावलेल्या लोकांनी आणि मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने करण्यात आल्याचे आता तपासात उघड होत आहे. या चौघांच्याही शरीरावर झाडण्यात आलेल्या गोळ्या एकाच पद्धतीच्या असल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भातखळकर यांच्यात खडाजंगीएका विशिष्ठ विचारांच्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आघाडी सरकारच्या काळात केली गेली होती. त्यावर अजूनही निर्णय प्रलंबित असून त्या संस्थेवर आता बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चव्हान यांच्या भाषणावर हरकत घेत तत्कालीन यूपीए सरकारनेच सनातन संस्थेच्या बंदीचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे सांगितले. यावर चव्हाण यांनी हा प्रस्ताव अद्यापही फेटाळण्यात आला नसल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी एकीकडे भाजप आमदार तर दुसरीकडे काँग्रेस आमदारानी गदारोळ घालत वेलमध्ये येण्याचा प्रयत्न केला .कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य सूत्रधार मोकाटकोरेगाव भीमाची दंगल ही पूर्व नियोजित असल्याचे म्हटले आहे. या दंगलीला जबाबदार असलेल्या व्यक्तींना खऱ्या अथार्ने अटक होणे गरजेचे होते. मात्र, तो मोकाट आहे. राज्यात त्या व्यक्तीचा सत्कार होत आहे. भाषणे होत आहे. तेव्हा त्याला सरकारचा राजाश्रय आहे, असे का समजू नये, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.अहमदाबादचे महत्त्व वााढवण्यासाठी बुलेट ट्रेनपंतप्रधानांनी केवळ अहमदाबादचे महत्व वाढवण्यासाठीच बुलेट ट्रेन आणली आहे. यामुळे महाराष्ट्राला कुठलाही फायदा होणार नाही. ७० टक्के ही रेल्वे गुजरातमध्ये आहे. तेव्हा महाराष्ट्राने अर्धा निधी काा द्यावा, असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.