शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

अपत्यांची जबाबदारी केवळ वडिलांची नाही

By admin | Published: October 29, 2016 2:20 AM

विभक्त झालेले वडील व आई हे दोघेही नोकरी करीत असल्यास अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी केवळ वडिलांवर टाकता येणार नाही.

हायकोर्टाचे निरीक्षण : आईनेही द्यायला हवे योगदानराकेश घानोडे  नागपूरविभक्त झालेले वडील व आई हे दोघेही नोकरी करीत असल्यास अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी केवळ वडिलांवर टाकता येणार नाही. आईनेही त्यात आर्थिक योगदान द्यायला हवे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व इंदिरा जैन यांनी हा निर्णय दिला आहे.प्रकरणातील वडील मनोज व आई उर्मिला यांना १० वर्षांचा मुलगा व ९ वर्षांची मुलगी आहे. मनोज व उर्मिला यांचे २६ आॅक्टोबर १९९७ रोजी लग्न झाले होते. सध्या ते विभक्त झाले असून, दोन्ही मुले उर्मिलासोबत राहात आहेत. उर्मिला व मुलांनी मनोजकडून पोटगी मिळण्यासाठी नागपूर कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३० नोव्हेंबर २००९ रोजी कुटुंब न्यायालयाने उर्मिलाला पोटगीसाठी अपात्र तर, मुलांना पात्र ठरविले होते. तसेच, दोन्ही मुलांना एकूण सात हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश मनोजला दिला होता. या निर्णयाविरुद्ध मनोजने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय लक्षात घेता, आई व वडील नोकरीवर असल्यास त्या दोघांनीही अपत्यांच्या पालनपोषणासाठी आर्थिक उत्पन्नाच्या आधारे योगदान द्यायला हवे, असे स्पष्ट करून कुटुंब न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशात बदल केला. दोन्ही अपत्यांना मनोजने एकूण पाच हजार रुपये मासिक पोटगी द्यावी व उर्वरित खर्च उर्मिलाने सोसावा, असे नवीन आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.आई व वडील आहेत लघुलेखकप्रकरणातील आई उर्मिला तृतीय श्रेणीची तर, वडील मनोज द्वितीय श्रेणीचे लघुलेखक आहेत. न्यायालयासमक्ष करण्यात आलेल्या दाव्यानुसार दोघांचेही वेतन १५ ते १६ हजारादरम्यान आहे. उर्मिलाचे वेतन थोडे कमी आहे. यामुळे उच्च न्यायालयाने उर्मिलावर अपत्यांच्या पालनपोषणाचा कमी भार टाकला आहे.