...तर दुसरी पत्नी पोटगीस अपात्र; हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:27 AM2021-03-02T11:27:10+5:302021-03-02T11:27:32+5:30

Nagpur news अवैध लग्न करणाऱ्या पत्नीला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी एका प्रकरणात दिला.

... then second wife not eligible for maintenance ; High Court decision | ...तर दुसरी पत्नी पोटगीस अपात्र; हायकोर्टाचा निर्णय

...तर दुसरी पत्नी पोटगीस अपात्र; हायकोर्टाचा निर्णय

Next
ठळक मुद्देअपील खारीज केले

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : अवैध लग्न करणाऱ्या पत्नीला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी एका प्रकरणात दिला.

नागपूर येथील प्रज्ञा व अविनाश (बदललेली नावे) यांनी १३ मे २००७ रोजी लग्न केले होते. अविनाशचे हे दुसरे लग्न होते. त्यावेळी त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्याचे पहिले लग्न कायम होते. त्यामुळे त्याचे प्रज्ञासोबतचे लग्न अवैध ठरले. ते लग्नानंतर काही दिवस आनंदात सोबत राहिले. पुढे त्यांच्यात वाद व्हायला लागले. त्यांचे सतत या ना त्या कारणावरून भांडणे होत होती. परिणामी, ६ एप्रिल २००९ पासून दोघेही वेगळे झाले. दरम्यान, प्रज्ञाने पोटगी मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २८ जानेवारी २०१६ रोजी कुटुंब न्यायालयाने प्रज्ञाचे अविनाशसोबतचे लग्न अवैध ठरवून तिला पोटगी मंजूर करण्यास नकार दिला. त्या निर्णयाविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता कुटुंब न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन प्रज्ञाचे अपील फेटाळून लावले.

Web Title: ... then second wife not eligible for maintenance ; High Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.