शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

‘तो’ आरोपी प्राध्यापक निलंबित

By admin | Published: April 25, 2017 1:46 AM

धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेज येथील विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी करणारा शिक्षक अमित गणवीर याला अखेर निलंबित करण्यात आले आहे.

धरमपेठ शिक्षण संस्थेची कारवाई : नागपूर सुधार समितीचा मूकमोर्चानागपूर : धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेज येथील विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी करणारा शिक्षक अमित गणवीर याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे ही कारवाई करण्यात आली असून एकूण घटनेची चौकशी करण्याचे आश्वासनदेखील देण्यात आले आहे. दरम्यान, प्राध्यापकासोबत प्राचार्यांचेदेखील निलंबन करण्यात यावे, या मागणीसाठी नागपूर सुधार समितीतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला.धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेज येथील शिक्षकाने एका विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. यानंतर या शिक्षकाला काळे फासण्यात आले होते. या मुद्यावरून राजकारणदेखील तापले. निलंबनाची कारवाई न केल्यास सोमवारपासून कॉलेजच्या समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा समितीचे प्रशांत पवार, नगरसेवक बंटी शेळके व पंजू तोतवानी यांनी दिला होता.सोमवारी सकाळच्या सुमारास शंकरनगरस्थित धरमपेठ शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर समितीतर्फे मूकमोर्चा काढण्यात आले. या वेळी सर्व उपस्थित सदस्यांनी तोंडाला व डोळ्याला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविला. संस्थेच्या संचालकांना यावेळी निवेदनदेखील देण्यात आले. संबंधित प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. यासंदर्भात धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर यांना विचारणा केली असता त्यांनी अमित गणवीर याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असेदेखील त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करादरम्यान, सुधार समितीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व प्राचार्यांनादेखील निलंबित करण्याची मागणी केली. सोबतच धरमपेठ पॉलिटेक्निकची परीक्षा केंद्र म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी. जर असे झाले नाही तर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.