शहरं
Join us  
Trending Stories
1
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
2
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
3
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
4
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
5
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
6
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
7
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
8
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
9
Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!
10
'धूम २'मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने हृतिक रोशनसोबत दिला होता किसिंग सीन, याबद्दल अभिनेत्री म्हणाली....
11
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
12
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
13
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
14
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
15
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
16
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश
17
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
18
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
19
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
20
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?

...तर वयाच्या २५ वर्षांपर्यंत मिळणार नाही लायसन्स

By सुमेध वाघमार | Published: November 20, 2024 3:54 PM

परिवहन विभागाच्या सारथी प्रणालीत बदल : पुणे येथील पोर्शे कार अपघाताचा संदर्भ

सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास त्याला वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत लायसन्स न देण्याचा कायदा आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणीच होत नव्हती. गुन्हा करूनही अल्पवयीन मुलांना लायसन्स मिळायचे. अखेर याची दखल परिवहन विभागाने घेतली. सारथी प्रणालीमध्ये नियमानुसार आवश्यक बदल करून घेतले. त्यामुळे आता अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास लर्निंग लायसन्सच निघणार नाही.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे या लक्झरी कारने दुचाकी चालवत असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली, त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने देशाचे लक्ष वेधले होते. मोटार वाहन कायद्यातील अल्पवयीन वाहनचालकांच्या संदर्भातील कायद्याच्या प्रश्नचिन्ह अंमलबजावणीवरही उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे, मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम १९९ अ (५) नुसार १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास मुलाचे पालक किंवा मोटार वाहनाचा मालक दोघांनाही दोषी मानले जाते. यात २५ हजारांचा दंडासह पालक किंवा मोटार वाहन मालकाला तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. तसेच अल्पवयीन मुलाला वयाच्या २५व्या वर्षापर्यंत वाहन परवाना न देण्याची तरतूद आहे. परंतु नागपुरात तरी या कायद्याची अंमलबजावणी केवळ दंडात्मक कारवाई पुरतीच मर्यादित राहायची. गुन्हा करूनही अनेकांना लायसन्स मिळायचे. याच्या तक्रारी झाल्याने अखेर परिवहन विभागाने पुणे येथील पोर्शे कारचा संदर्भ देत अल्पवयीन वाहन चालकांना वयाच्या २५व्या वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही यासाठी सारथी प्रणाली ४.० मध्ये आवश्यक बदल करण्याकरिता पुण्याचा राष्ट्रीय सूचना केंद्र यांना कळविले. 

आरटीओच्या कारवाईकडे लक्ष परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सोमवारी पत्राद्वारे प्रणालीत केलेल्या बदलांची माहिती दिली. वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना परवाना प्राप्त होऊ नये याबाबत कारवाई करावी, असे निर्देशही दिले. त्यामुळे आरटीओच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

अल्पवयीन मुलांच्या हाती का नको वाहने? चौदा ते सतरा वर्षे वयापर्यंत मुलांमध्ये आक्रमक वृत्ती असते. या वयात हार्मोनमध्ये बदल होत असतात. त्यामुळे काहीतरी थ्रिलिंग, अतिसाहस, इतरांपेक्षा थोडे वेगळे करण्याची इच्छा होत असते. हार्मोन आणि मनावरील कंट्रोल यांची सांगड घालता येत नसल्याने अघटित घडण्याची शक्यता असते. या वयात कायद्याची विशेष भीती नसते. आपल्या हातून चूक झाल्यास त्याला काहीच वाटत नसल्याने बेदरकार वृत्ती निर्माण होते. त्यामुळे अल्पवयीन मुलांना वाहन नकोच, असे मनोविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :nagpurनागपूर