शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

Corona Virus in Nagpur; ... तर विदर्भात होतील ७६ हजार कोरोनाग्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 7:08 PM

आरोग्य आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व मनपा आयुक्तांना पत्र लिहून सजग राहण्याचे आवाहन केले आहे. या पत्राच्या संकेतानुसार विदर्भात कोरोना विषाणूने संक्रमित रुग्णांचा आकडा ७५ हजार ८०१ होण्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने एवढ्याच बेड्सची गरज भासणार आहे.

ठळक मुद्देआरोग्य आयुक्तांच्या पत्रातील निष्कर्षबेड्सची संख्या वाढविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या अन्य क्षेत्रांच्या तुलनेत नागपूरसह संपूर्ण विदर्भात कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा प्रसार तेवढासा चिंताजनक नाही. विदर्भातील बव्हंशी कोरोनाग्रस्त क्वॉरंटाईन करण्यात आलेल्यांतूनच येत आहेत. नव्या भागातही प्रसार मंद आहे. मात्र, येणाऱ्या काळाचा धसका घेता राज्यसरकार सजग झालेले आहे. जास्तीत जास्त रुग्णांच्या व्यवस्थापनाची काळजी घेतली जात आहे. याच श्रृंखलेत आरोग्य आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व मनपा आयुक्तांना पत्र लिहून सजग राहण्याचे आवाहन केले आहे. या पत्राच्या संकेतानुसार विदर्भात कोरोना विषाणूने संक्रमित रुग्णांचा आकडा ७५ हजार ८०१ होण्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने एवढ्याच बेड्सची गरज भासणार आहे. पत्र प्राप्त होताच प्रशासनाने रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या वाढविण्याच्या दिशेने सुरुवात केली आहे.हे पत्र १३ एप्रिल रोजीच प्राप्त झाले. प्रत्येक रुग्णावर उपचार झालाच पाहिजे, त्याअनुषंगाने पत्रात संभावित रुग्णांची संख्या सादर करण्यात आली आहे. वर्तमान स्थिती बघता आकडेवारीचे आकलन करणे कठिण आहे तरी देखील तयारीला वेळ मिळावा म्हणूनच ही संभावित आकडेवारी सादर करण्यात आल्याचेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. संसर्गाचे किंतु-परंतु या पातळीवर विश्लेषण करता विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये कोविड १९चे जास्तीत जास्त ७५ हजार ८०१ प्रकरणे असतील. त्यात सर्वाधिक प्रकरणे नागपुरात १८ हजार ९०२ असतील. या पत्रात ही आकडेवारी कधीपर्यंतची असू शकेल, याचा उल्लेख नाही. तरीदेखील १० मे पर्यंत एवढे बेड्स उपलब्ध करण्याच्या दिशेने प्रशासन सज्ज झाले आहे. संशयितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकाला क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. मेयो व मेडिकल कॉलेज रुग्णालयात बेड्सची संख्या वाढविली जात आहे. मेडिकलच्या ट्रामा सेंटर्सला कोविड रुग्णालयच्या स्वरूपात परिवर्तित करण्यात आले आहे. येथे १२५० बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून खाजगी इस्पितळांमध्येही १३२० बेड्सची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.६० टक्के नागरिकांमध्ये लक्षण दिसणार नाही!पत्रात रुग्णांच्या अंदाजित संख्येच्या ६० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेच लक्ष दिसणार नाहीत. २० टक्के रुग्णांमध्ये सौम्य व ऊर्वरित २० टक्के रुग्णांमध्ये स्पष्ट लक्षणे दिसून येतील. केंद्र सरकारच्या दिशा-निदेर्शानुसार या आपातकालिन स्थितीसंदर्•ाात त्रिस्तरीय तयारी केली जात आहे. लक्षण नसणाºया रुग्णांना कोविड केयर सेंटरमध्ये ठेवले जाईल. अन्य रुग्णांची व्यवस्था कोविड हेल्थ सेंटरमध्ये होईल. त्याच अनुषंगाने ४० टक्के बेड्सची संख्या तात्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश असून ऊर्वरित बेड्सचे व्यवस्थापन टप्प्या टप्प्यात होईल.स्थळ रुग्णांची सं•ाावित आकडेवारीनागपूर शहर ११,११४नागपूर ग्रामीण ७,७८८यवतमाल ९,६१७बुलढाणा ८,९६८अमरावती शहर २,२४२अमरावती ग्रामीण ७,७६४अकोला शहर १,४७५अकोला ग्रामीण ४,८२६चंद्रपुर शहर ७४०चंद्रपुर ग्रामीण ४,३२९वर्धा ४,४९१वाशिम ४,१४७गोंदिया ३,०५५•ांडारा २,७६९गडचिरोली २,४७६---------------एकूण ७५,८०१

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस