३२ लाख मंजूर : बसेसची संख्याही वाढविणारवसीम कुरेशी - नागपूर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)उपेक्षित असलेल्या मोरभवन बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी पाऊल उचलले आहे. मोरभवन बसस्थानकाच्या विकासासाठी ३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून येथे आता ८ अतिरिक्त प्लॅटफार्म तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय डांबरीकरण आणि सुरक्षा भिंतीचे कामही करण्यात येणार आहे.नुकत्याच स्टार बससाठी जागा ताब्यात घेण्याचा जोरदार प्रयत्न झाल्यानंतर एसटीच्या मुख्यालयाने मोरभवन बसस्थानकाचा कायापालट करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यात २० लाख रुपये खर्चून डांबरीकरण, १० लाख रुपयात नवे प्लॅटफार्म आणि २ लाख रुपयात सुरक्षा भिंतीचे काम करण्यात येणार आहे. शहराच्या मध्यभागी असूनही मोरभवन बसस्थानक उपेक्षित होते. हे बसस्थानक खोलगट जागेवर असल्यामुळे पावसाळ्यात तेथे पाणी साचते. मागील वर्षी पावसाळ्यात बसेस पाण्यात बुडाल्या होत्या. परंतू विकासकामे करण्याची कुठलीच तरतूद महामंडळाकडे नव्हती. पावसाळ्यात स्थानक प्रमुख कार्यालय आणि प्लॅटफार्म ५ ते ६ फूट पाण्यात बुडाले होते. प्लॅटफार्मच्या बाजूच्या सुरक्षा भिंतीचा काही भागही तुटुन पडला आहे. प्रवासी सुविधांचा अभावमोरभवन बसस्थानकात बसेस ठेवण्यासाठी असलेली जागा ओबडधोबड झाली असून डांबरीकरण नसल्यामुळे येथे धूळ उडते. डांबरीकरण झाल्यास यापासून सुटका होणार आहे. सध्या येथून ७५० बसेस सुटतात. परंतु तरीसुद्धा येथे प्रवासी सुविधा नाहीत. बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.
मोरभवन बसस्थानकात आता १५ प्लॅटफॉर्म
By admin | Published: November 13, 2014 12:53 AM