शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात ‘घरकूल’साठी १८ हजार अर्जदार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 9:58 PM

पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत हक्काचे घरकूल मिळविण्यासाठी नागपुरातील तब्बल ७२ हजार नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे तसेच छाननीनंतर फक्त १८ हजार नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. सुमारे ७५ टक्के अर्जदार घरकुलापासून वंचित राहणार आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान घरकूल योजना : नासुप्र आणि म्हाडा देणार घर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत हक्काचे घरकूल मिळविण्यासाठी नागपुरातील तब्बल ७२ हजार नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे तसेच छाननीनंतर फक्त १८ हजार नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. सुमारे ७५ टक्के अर्जदार घरकुलापासून वंचित राहणार आहेत.पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत नासुप्र घरे बांधणार आहे. महापालिकेत अर्ज करणाऱ्या  पात्र नागरिकांना नासुप्र आणि म्हाडा घरे देणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी सांगितले. कंपनीने या नागरिकांची तपासणी केल्यानंतर घरकूल योजनेसंदर्भातील डीपीआर राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान घरकूल योजनेतील निकषाप्रमाणे आलेल्या ७२ हजार अर्जांपैकी ४२ हजार नागरिकांनी आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रे सादर केली होती. यातील १८ हजार नागरिक पात्र ठरले असून, त्यांची आता महापालिकेतर्फे तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी मे. आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या कंपनीची निविदा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. या कंपनीला प्रति नागरिक १४८ रुपये शुल्क दिले जाणार आहे. महापालिका एकूण २६ लाख ६४ हजार रुपये या कंपनीला देणार आहे. परंतु या कंपनीने किती कालावधीत तपासणीचे काम करावे, याबाबत कुठलीही स्पष्टता नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHomeघर