शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांत शिक्षकच नाही, शिक्षण समितीत पडसाद

By गणेश हुड | Published: June 08, 2023 2:42 PM

शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची ६०० हून अधिक पदे रिक्त आहेत. तर  ५१ शाळांतशिक्षकच नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थित शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दावा कसा करू शकतो. असा सवाल शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला. 

जि.प.च्या शिक्षण समितीची बैठक बुधवारी सभापती राजू कुसुंबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान, सदस्या शांता कुमरे यांनी त्यांच्या सर्कलमध्ये २५ शिक्षकांची कमतरता असल्याने नाराजी व्यक्त केली. आपले सर्कल दुर्गम भागात असताना प्रशासनाने शिक्षक उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते; परंतु शिक्षक भरतीचे कारण पुढे केले जाते. त्याचा फटका ग्रामीण भागातील विद्याथ्यांना बसतो आहे.

एकीकडे शाळेतील पटसंख्या कमी होत असताना जिथे चांगली पटसंख्या आहे, तिथे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांयांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार? असा सवाल त्यांनी केला. शासन जोपर्यंत शिक्षकभरती करणार नाही, तोपर्यंत कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या करा, यासाठी १.५० कोटींची तरतूद करण्याची मागणी सदस्यांनी केली. 

अशी आहेत रिक्त पदे तालुका - रिक्त पदेरामटेक - १९३पारशिवनी - ५७नरखेड - १०८ मौदा - ११०एकही शिक्षक नसलेल्या शाळा 

तालुका - शाळाहिंगणा - ३कळमेश्वर - २मौदा - ५उमरेड - ४ भिवापूर - ४नरखेड - ९काटोल - ४रामटेक - ४सावनेर - ४कुही - ९पारशिवनी - ३

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकzpजिल्हा परिषदSchoolशाळाStudentविद्यार्थीnagpurनागपूर