लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ तीन अर्ज दाखल झाले असून, रामटेककरिता एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. नागपूर व रामटेक लोकसभा मिळून गेल्या तीन दिवसात १४८ लोकांनी १९० अर्ज घेतले. धुलिवंदनानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास जोर वाढणार आहे.सोमवारपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी अब्दुल पटेल तर दुसऱ्या दिवशी उत्तम दुपारे यांनी अर्ज दाखल केले. आज बुधवारी दीपक लक्ष्मणराव मस्के यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. हे तीनही अर्ज नागपूर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झाले. रामटेककरिता आतापर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत रामटेककरिता ५१ लोकांनी ७५ अर्ज नेले तर नागपूरकरिता ९७ लोकांनी ११५ अर्ज नेले.आतापर्यंत एकाही मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने अर्ज सादर केलेला नाही. भाजपतर्फे नितीन गडकरी हे उमेदवार राहणार हे निश्चित असले तरी अजून त्यांच्या पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसतर्फे नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. परंतु त्यांनीही अद्याप अर्ज सादर केलेला नाही. विदर्भ निर्माण महामंचचे उमेदवार अॅड. सुरेश माने हे २२ तारखेला अर्ज सादर करणार असल्याची माहिती आहे. नितीन गडकरी हे शेवटच्या दिवशी अर्ज सादर करणार आहेत. काँग्रेसचे पटोले हे सुद्धा शेवटच्या दिवशी अर्ज सादर करू शकतात. बसपा आणि बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराची घोषणाही अद्याप व्हायची आहे. एकूणच धुलिवंदनानंतर सर्व पक्षाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल, तेव्हा उमेदवारी अर्ज भरायलाही जोर वाढेल.
नागपुरात तीन अर्ज दाखल, रामटेकमध्ये एकही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 9:52 PM
नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ तीन अर्ज दाखल झाले असून, रामटेककरिता एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. नागपूर व रामटेक लोकसभा मिळून गेल्या तीन दिवसात १४८ लोकांनी १९० अर्ज घेतले. धुलिवंदनानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास जोर वाढणार आहे.
ठळक मुद्देतीन दिवसात १४८ लोकांनी घेतले १९० अर्ज