लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आरएसएसच्या प्रभावाखाली राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जातीय देशातील सलोखा बिघडवत आहे. देशात त्यामुळेच जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू आहे. कोरेगाव-भीमा व जळगावचे उदाहरण ताजे आहे. खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून निरपराध्यांना लक्ष्य केले जात आहे. जातीय दंगली या सरकारपुरस्कृत आहेत व येत्या निवडणुका लक्षात घेता ध्रुवीकरण करण्यासाठी पुन्हा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केला.डॉ. वाघमारे शनिवारी नागपुरात आले होते़ पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरकार घोषणेत आॅनलाईन असले तरी कामात आॅफलाईन असून, त्यांचा कारभार पूर्णपणे हँग झाला आहे. कर्जमाफी योजनेचा गवगवा केला गेला़ मात्र या योजनेचा पुरता बोजवारा उडाला़ अद्याप खरीपाचे कर्जही शेतकऱ्यांना मिळालेले नाही़ केवळ १० टक्के कर्जवाटप झाले आहे़ राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे़ सरकारपुरस्कृत दंगलीमुळे राज्य होरपळून निघाले आहे़ कोरगाव-भीमा प्रकरणातील आरोपी असलेल्या संभाजी भिडेंना पाठीशी घालून सरकार जे पीडित आहेत त्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भिडेंना क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याच्या कोणत्या विभागाद्वारे चौकशी केली, हे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील घटनाही अशीच हाताळली जात असून, गुन्हेगारांऐवजी तेथील पीडित कुटुंबच दहशतीखाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढली आहे़ कायदा सुव्यवस्थेची पुरती दैना झाली आहे़ असे असतानाही मु्ख्यमंत्री गृहमंत्रिपद सोडायला तयार नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी पत्रपरिषदेला प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस नेते दिनेश बानाबाकोडे, संदीप सहारे, संजय मेश्राम, रमण पैगवार, अनिल नगरारे, जयंत लुटे आदी उपस्थित होते़.
ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:50 PM
आरएसएसच्या प्रभावाखाली राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जातीय देशातील सलोखा बिघडवत आहे. देशात त्यामुळेच जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू आहे. कोरेगाव-भीमा व जळगावचे उदाहरण ताजे आहे. खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून निरपराध्यांना लक्ष्य केले जात आहे. जातीय दंगली या सरकारपुरस्कृत आहेत व येत्या निवडणुका लक्षात घेता ध्रुवीकरण करण्यासाठी पुन्हा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केला.
ठळक मुद्देकाँग्रेसचे राजू वाघमारे यांचा आरोप