नागपुरातील साल्पेकरबुवा यांच्या घरून झाली होती चोरी : पुरावशेष व बहुमूल्य कलाकृती अधिनियम १९७२ अन्वये नोंदणीकृतआशिष दुबे नागपूर बऱ्याच वर्षापूर्वी नागपुरातील साल्पेकरबुवा यांच्या घरून चोरी झालेल्या ज्ञानेश्वरीच्या प्राचीन हस्तलिखित प्रतिलिपीची माहिती मिळाली आहे. ही प्रतिलिपी अमेरिका येथील वर्जिना संग्रहालयात आहे. काही दिवसापूर्वी याचा खुलासा झाला असून, ही प्रतिलिपी परत आणण्यासाठी अजूनही कुठलाच प्रयत्न केला गेलेला नाही. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार प्रतिलिपी पुरावशेष व बहुमूल्य कलाकृती अधिनियम १९७२ अन्वये नोंदणीकृत असून, तत्कालीन नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रशेखर गुप्त यांनी याची पुष्टी केली आहे. डॉ. गुप्ता यांनी सांगितले की, विदेशी नागरिक डॉ. कैथरिन ही नागपूर भ्रमणासाठी आली होती. त्यांनी आपल्यासोबत वर्जिना संग्रहालयातील ज्ञानेश्वरीच्या प्रतिलिपीचा फोटो आणला होता. त्यांनी हा फोटो नागपुरातील डॉ. देशमुख यांना दाखविला होता. डॉ. देशमुख यांनी कैथरिन यांना पुरातत्त्व विशेषज्ञ डॉ. गुप्त यांना भेटण्याचा सल्ला दिला. कैथरिन यांनी गुप्त यांची भेट घेऊन त्यांना प्रतिलिपीचा फोटो दाखविला. हे चित्र बघून डॉ. गुप्त यांनी या प्रतिलिपीची नोंदणी मीच केली असल्याची पुष्टी केली. यासंदर्भात त्यांनी लोकमतला संपर्क करून सांगितले की, संत ज्ञानेश्वरांनी गीतेची रचना मराठीत केली होती. हे कार्य १३ व्या शतकात झाले होते. यावेळी गीतेच्या प्रचार प्रसारासाठी तत्कालीन शासन व त्याकाळातील संपन्न लोकांनी त्याची प्रतिलिपी बनविली होती. १८ व्या शतकात काही प्रतिलिपी नागपुरातही बनविण्यात आल्या होत्या. यातील एक प्रतिलिपी पंडित साल्पेकरबुवा यांना राजा जानोजी भोसले यांनी प्रदान केली होती. ही प्रतिलिपी त्यांच्याकडे बरेच वर्षे होती. त्यानंतर केंद्र सरकारने ऐतिहासिक संदर्भांना संरक्षित करण्यासाठी अधिनियम बनविले. १९७५ पासून ते लागू करण्यात आले. नागपुरातील पुरावशेष व बहुमूल्य कलाकृतींना अधिनियमान्वये नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकारी म्हणून मला नियुक्त केले होते. त्यामुळे या प्रतिलिपीची नोंदणी माझ्या हस्ते झाल्याचा दावा डॉ. गुप्त यांचा आहे.