लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतीमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्यांचा शिरकाव आणि त्यावर रासायनिक खते व कीटनाशकांचा वाढता वापर यामुळे अनेक प्रकारचे नवीन आजार बळावले आहेत. कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व किडनीच्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.रासायनिक कीटनाशकांमुळे शेतात राबणारे शेतकरी, मजूर यांच्यासह दररोज ताटात हे विष घेणाऱ्या सामान्य नागरिकांनाही याचे भीषण परिणाम भोगावे लागत आहेत. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी आज सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय उरला नाही, असे प्रतिपादन सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ डॉ. सुमेध जाजू यांनी केले.गेल्या तीन दिवसांपासून नागपूरकरांना रासायनिक विष सोडून सेंद्रिय अन्नाकडे प्रोत्साहित करणाऱ्या बीजोत्सव कृषी प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. प्रदर्शनात शेतकऱ्यांनी आणलेल्या धान्यापासून सर्व प्रकारचे जिन्नस भरभरून खरेदी केले. शेवटच्या दिवसांपर्यंत शेतकºयांचा बहुतेक माल संपला होता. यावरून नागपूरकर सेंद्रिय आहाराबाबत जागृत होत असल्याचेच दिसून येते. अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात डॉ. जाजू यांनी रासायनिक खते, कीटनाशक मधील नायट्रोजन, मोनो क्रोटो फॉस, ग्लायकोसेट, एंडोसल्फान अशा विषारी घटकांमुळे शरीरावर हळुहळू कसे दुष्परिणाम होत आहेत, याचे प्रात्याक्षिकच मांडले. सेवाग्राम येथील त्यांच्या रुग्णालयात दरवर्षी कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतात काम करणारे ३५० च्यावर लोक उपचारासाठी येतात व त्यातून २०० रुग्णांना कधी कधी महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. हे कीटकनाशक भूजलही प्रदूषित करतात. शिवाय अन्नाद्वारे शरीरात येणाºया या रासायनिक घटकांमुळे हृदय, किडनी व इतर अवयवांचे काम मंदावते. गर्भस्थ मातांना गंभीर आजार होतात तर शिशुंच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होतात. यातील बहुतेक कीटकनाशकावर इतर देशांमध्ये बंदी आहे. श्रीलंकेने संपूर्ण बंदी घातल्याने कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे होणारे मृत्यूदर ५० टक्क्याने कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.युरोपियन युनियनच्या बहुतेक देशांमध्ये या कीटनाशकांवर बंदी आहे. भारतात मात्र या विषाचा सर्रासपणे वापर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कीटकनाशकांच्या विदेशी कंपन्यांच्या दबावात भारत सरकार नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत असल्याची टीका त्यांनी केली.या सत्रांमध्ये सचिन बारब्दे यांनी ‘आदिवासींची खाद्यसंस्कृती व पोषण’ या विषयावर मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रात अनेजा व रुपिंदर नंदा यांनी नागपुरात त्यांच्या वस्तीत चालविलेल्या कम्युनिटी फार्मिंगचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.यावेळी वसंत फुटाणे, डॉ. सतीश गोगुलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या संपूर्ण आयोजनात कीर्ती मंगरुळकर, शेतीतज्ज्ञ अमिताभ पावडे, सुषमा खोब्रागडे, हर्षल अवचट, अश्विनी औरंगाबादकर, अतुल उपाध्याय, प्राची माहूरकर आकाश नवघरे, सजल कुलकर्णी आदींनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
निरोगी जीवनासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:20 AM
सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय उरला नाही, असे प्रतिपादन सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ डॉ. सुमेध जाजू यांनी केले.
ठळक मुद्देबीजोत्सवाचा समारोप नागपूरकरांचा विषमुक्त धान्याला भरघोस प्रतिसाद