लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात ९० हजार बेवारस कुत्रे असून त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. त्यातच पशुप्रेमी कायद्याचा आधार घेत कुत्र्यांना पकडण्याला विरोध दर्शवितात. दुसरीकडे सक्षम यंत्रणा नसल्याने महापालिकेचा कोंडवाडा विभाग हतबल असल्याने मोकाट कुत्र्यांचा शहरात मुक्त संचार आहे.
कुत्रे पकडण्यासाठी फक्त दोन ट्रॉलीमोकाट कुत्र्यांबाबत तक्रार आल्यास अशा कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जाते. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडावे लागते, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली. विभागाकडे मोकाट कुत्रे पकडण्यासाठी दोन वाहने (ट्रॅक्टर ट्रॉली) आहे. त्यावर काम करण्यासाठी दोन कर्मचारी आहेत. झोनच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते, अशी माहिती महल्ले यांनी दिली.
झोनला आठवड्यातून दोनदा गाडी मिळतेमोकाट कुत्रे पकडण्यासाठी दोन गाड्या असल्याने प्रत्येक झोनला आठवड्यातून दोन दिवस गाडी उपलब्ध होते. त्यामुळे तक्रारी अधिक असल्यास तक्रारकर्त्याला गाडीची प्रतीक्षा करावी लागते. मनुष्यबळ व वाहनांचा अभाव आहे. वाहनांची संख्या वाढण्यिाची गरज आहे.
नसबंदीवरही मर्यादाकायद्यानुसार मोक ाट कुत्र्यांबाबत तक्रार असली तरी त्याला पकडून दुसरीकडे नेऊ न सोडता येत नाही. पकडून त्यावर नसबंदी करून पुन्हा त्याच वस्तीत सोडावे लागते. भांडेवाडी येथे नसबंदी केंद्र आहे. परंतु दिवसाला येथे फक्त सहा ते सात कुत्र्यांवर नसबंदी करण्याची सुविधा आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या विचारात घेता व्यवस्था अपुरी आहे. केंद्र अधिक सक्षम करण्याची गरज आहे.
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीकडे दुर्लक्षचउपराजधानित गल्लीबोळापासून ते रस्त्यावर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ही संख्या साडेतीन लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज खुद्द महानगरपालिकेच्या कर्मचाºयांचा आहे. यातील कुत्री चार ते पाच जणांना रोज चावतात. गेल्या वर्षी सुमारे ९ हजारावर लोकांना चावा घेतला आहे. ही आकडेवारी मनपासह शासकीय रुग्णालयांमधील आहे, असे असताना कुत्र्यांच्या झुंडीकडे स्वत:च प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.शहरातील रस्त्यावर मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषत: रात्रपाळी करून घरी परतणाºया नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. जाटतरोडी चौक ते मेडिकल चौक मार्ग, लोखंडी पूल ते शनिमंदिर, मानेवाडा रिंग रोड, उंटखाना चौक ते अशोक चौक, प्रतापनगर सिमेंट रोड ते गोपालनगर, काचीपुरा रामदासपेठ मार्ग, अभ्यंकरनगर रोड, सुगतनगर मार्ग, लष्करीबाग चौक ते वैशालीनगर चौक यासह जिथे-जिथे उघड्यावर मांसविक्री होते तिथे-तिथे या झुंडी दिसून येतात. परंतु याकडे अद्यापही महापालिकेचे लक्ष नसल्याचे दिसून येते.
सक्करदरा येथे १२ कुत्र्यांच्या झुंडीची दहशतबुधवारी बाजार सक्करदरा येथे १२ कुत्र्यांच्या झुंडीची दहशत आहे. अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतला तरी बंदोबस्त झाला नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.गेल्या काही महिन्यात लहान मुलांना चावण्याचा घटना वाढल्या आहेत. रात्रीला कामावरून घरी परतणारे कुत्र्यांमुळे दहशतीत असतात. दुचाकी वाहन दिसले की कुत्रे धावतात. यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. मोकाट कुत्र्यांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्वेक्षणानुसार नागरी लोकसंख्येच्या तुलनेत मोकाट कुत्र्यांची संख्या सरासरी तीन टक्के असते. याचा विचार करता शहरात ८० ते ९० हजार मोकाट कुत्री आहेत. शहरालगतच्या भागातील संख्या अधिक आहे.