लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यक क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टीस’ हा राज्यातच नव्हे तर देशपातळीवर चर्चेचा मुद्दा ठरला आहे. याचा ‘आयएमए’ विरोधच करीत आली आहे. राज्य शासनाने वैद्यकीय कट प्रॅक्टीस विरोधी कायदा अमलात आणण्याची पूर्ण तयारी केली आहे. मात्र, यातील तरतुदी वैद्यकक्षेत्राला कोणत्याही चौकशीविना आरोपीच्या पिंजºयात उभ्या करणाºया आहेत. या कायद्याच्या मसुद्यात ‘कट’ म्हणजे नेमके काय याची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही. त्यात कारवाई करण्याचे अधिकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले आहेत. यामुळे पोलीसराज येईल, असे प्रतिपादन महाराष्टÑ इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) मावळते अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी येथे केले. आयएमएच्या राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून शनिवारी डॉ. वाय. एस. देशपांडे पदभार स्वीकारणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला मावळते अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, सचिव डॉ. पार्थिव सिंघवी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांच्या उपस्थितीत मागील वर्षाचा आढावा घेऊन आगामी काळातील पुढील दिशा ठरविण्यात आली. दरम्यान सकाळी १५वी वार्षिक परिषद ‘मास्टाकॉन-२०१७’चे उद्घाटन पार पडले. यावेळी कराडच्या क्रिष्णा अभिमत वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. मिलिंद नाईक उपस्थित होते. डॉ. तांबे यांचा संवादातील धागा पकडून नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे म्हणाले, आपसांमधील वैमनस्य काढण्यासाठी या कायद्याचा आधार घेण्याची भीती आहे. डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, या कायद्यात जर कुणी साधी तक्रारही केली तर डॉक्टरला आरोपीच्या पिंजºयात उभे केले जाण्याची शक्यता आहे.लोकेंद्र सिंग यांच्या पुस्तकाचे प्रकाशनप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. लोकेंद्र सिंग यांच्या ‘रेमिनीसेन्सेस आॅफ न्यूरोसर्जन’ पुस्तकाचे प्रकाशन सायंकाळी आयएमए सभागृहात झाले. यावेळी आयएमएचे नॅशनल निर्वाचित अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, माजी अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, डॉ. अशोक तांबे, डॉ. पार्थिव सिंघवी, डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. जयेश लेले, डॉ. वाय. एस. देशपांडे, नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, सचिव डॉ. प्रशांत राठी, डॉ. अनिल लद्धड, डॉ. संजय देशपांडे, डॉ. आशिष दिसावल, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
‘कट प्रॅक्टीस’मध्ये ‘कट’ची व्याख्याच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:24 AM
वैद्यक क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टीस’ हा राज्यातच नव्हे तर देशपातळीवर चर्चेचा मुद्दा ठरला आहे. याचा ‘आयएमए’ विरोधच करीत आली आहे. राज्य शासनाने वैद्यकीय कट प्रॅक्टीस विरोधी कायदा अमलात आणण्याची पूर्ण तयारी केली आहे.
ठळक मुद्देअशोक तांबे यांचे प्रतिपादन : ‘आयएमए’च्या मास्टाकॉन परिषदेला सुरुवात