लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मानस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप याबाबत दोन्ही पक्षात कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच तशी कबुली दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली असून सहमती देखील झाली आहे. मात्र, जागा वाटपावर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीच्या गणेशपेठेतील कार्यालयात बुधवारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आज देशातील व्यापारी त्रस्त आहेत. रिटेल मार्केट उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने कुठलीही तयारी न करता नोटाबंदी, जीएसटी सारखे निर्णय घेत व्यापार क्षेत्र उद्ध्वस्त केले. युवकांना रोजगार मिळेनासा झाला आहे. पेट्रोल-डीझेलची दरवाढ लादली जात आहे. सरकारने निवडणुकीच्या पूर्वी बरीच आश्वासने दिली, त्यावर आता कुणीच बोलायला तयार नाही. आता जनतेने हे सरकार बदलण्याचे ठाणले आहे, असा दावा त्यांनी केला.भाजपा व्यापारी आघाडीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज फुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, आ. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, दिलीप पनकुले आदी उपस्थित होते.शिवसेनेवर विश्वास नाहीजयंत पाटील म्हणाले, जनतेचा मूड माहीत करून घेण्यासाठी पक्षातर्फे कुठलेही सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. मात्र, जनतेत खूप रोष दिसत आहे. त्यामुळे भाजपाचे सरकार कोसळेल यात शंका नाही. शिवसेनेवर कुणालाही विश्वास राहिलेला नाही. शिवसेना फक्त सत्ता भोगण्यासाठी भाजपासोबत आहे. महामंडळाच्या नियुक्तीत शिवसेनेलाही वाटा मिळाला हे याचे प्रमाण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
जागा वाटपावर अद्याप चर्चा नाही :जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:40 AM
आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मानस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप याबाबत दोन्ही पक्षात कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच तशी कबुली दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली असून सहमती देखील झाली आहे. मात्र, जागा वाटपावर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्देसरकार बदलणे निश्चित