लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून पाण्याच्या गुणवत्तेची केलेली तपासणी योग्य झाली नाही. यादरम्यान पारशिवनी तालुक्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये घोळ असल्याचे मत खुद्द जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचे सभापती शरद डोणेकर यांनी व्यक्त केले आहे.मंगळवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. पारशिवनी तालुक्यातील पाण्याचे सगळेच नमुने स्वच्छ होते असे या अहवालात नमूद आहे. मात्र आपल्याकडे या तालुक्यातील अस्वच्छ आणि दूषित पाण्याबाबत अनेक तक्रारी आल्याचे खुद्द सभापती डोणेकर म्हणाले.ग्रामीण भागातील पाणी स्वच्छ आहे की नाही यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. दर महिन्यात ही तपासणी होते. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते.तसेच संबंधित ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून मे महिन्यात तपासण्यात आलेल्या ५९१ पैकी पाण्याच्या नमुन्यापैकी ७८ अर्थात १३ टक्के पाणी नमुने दूषित आढळल्याची बाब मंगळवारच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीतून समोर आली.
नागपूर जिल्ह्यात पाण्याच्या गुणवत्तेची योग्य तपासणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:24 AM
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून पाण्याच्या गुणवत्तेची केलेली तपासणी योग्य झाली नाही. यादरम्यान पारशिवनी तालुक्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये घोळ असल्याचे मत खुद्द जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचे सभापती शरद डोणेकर यांनी व्यक्त केले आहे.
ठळक मुद्देआरोग्य सभापतींची समितीच्या बैठकीत नाराजी