लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत दर, चांगला दर्जा आणि आकर्षक सवलतीच्या नावावर ग्राहकांना मॉलकडे आकर्षिक करण्यात येते. मॉलच्या विविध योजनांकडे आकर्षित होत ग्राहकही तिकडे वळतात. मात्र मॉल झगमगाटामागे अवैध पार्किंग शुल्क वसुली, हेही एक कारण दडलय.मॉलमध्ये खरेदी करण्यास पार्किंग शुल्काचा भारही ग्राहकांना उचलावा लागतो.मॉलमध्ये होणारी अवैध पार्किंग शुल्क वसुली थांबविण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र त्यांचे ऐकणारे कुणी नाही. ग्राहक संरक्षण कायद्याचे अभ्यासकही मॉलमध्ये होणाºया पार्किंग शुल्क वसुलीवरून नाराज आहे. हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी आता उपराजधानीत जोर धरू लागली आहे.पोलीस तपासताहेत कायदाशॉपिंग मॉल आणि व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये पार्किंग शुल्क वसुलीबाबत कोणती कारवाई करता येऊ शकते यासंदर्भात पोलीस आयुक्तालयांकडून संबंधित कायदा आणि नियमांची चाचपणी केली आहे. जेणेकरून अवैध पार्किंग वसुलीसंदर्भात काही तक्रार आल्यास असे शुल्क वसुली करणाºयांवर स्थानिक पोलिसांना कारवाई करणे सोपे होईल. हैदराबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्राहकाकडून पार्किंग शुल्क वसूल करणाºया मॉलवर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशावेळी नागपुरात जर अशी परिस्थिती निर्माण झाली वा एखाद्या ग्राहकाने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली तर काय केले जाईल, असा प्रन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांना शनिवारी एका पत्रपरिषदेदरम्यान करण्यात आला होता. यावर नियम आणि कायदा तपासण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी लोकमतने ‘मॉलकडून पार्किंग शुल्काची अवैध वसुली’ यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. यावर डॉ.व्यंकटेशम् म्हणाले, हैदराबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी मॉलवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. यासंदर्भात स्थानिक कायद्यानुसार मॉलवर कारवाई केली जाऊ शकते का, यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडून चाचपणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रशासनाने कारवाई करावीबांधकाम कायद्यानुसार शॉपिंग मॉलमध्ये मोफत पार्किंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी मॉल संचालकाची आहे. कुणी बाहेरचा व्यक्ती गाडी पार्किंग करतो का, हे शोधायचे असल्यास त्यांच्याकडून मॉलमध्ये साहित्य खरेदीची पावती निश्चितच असेल. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था सांभाळणाºयांनाही ते सोईचे होईल व ग्राहकांचे हितही जोपासले जाईल. अवैध पार्किंग शुल्क बेकायदेशीर असून प्रशासनाने यावर करवाई करावी.- अॅड.अनिल किलोर, अध्यक्ष, हायकोर्ट बार असोसिएशनमॉल संचालकावर कारवाई हवीचमॉलमध्ये होणाºया अवैध पार्किंग शुल्क वसुलीसंदर्भात ग्राहक कल्याण परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. अवैध वसुली करणाºया मॉल संचालकांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. यासोबतच ग्राहकांशी मॉलमध्ये चांगले वर्तन करण्यात यावे. मॉलच्या पार्किंगमध्ये वाहनांची सुरक्षा करण्याची जबाबदारी मॉल संचालकांची असते.- देवेंद्र तिवारी, महासचिव, ग्राहक कल्याण परिषदलूट थांबणार कशी ?मॉलमधील पार्किंग व्यवस्थेमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालते. मात्र पार्किंग शुल्क नाममात्र आणि कमी असावे. जिथे जास्त पार्किंग शुल्क वसूल केले जाते, याकडे माल संचालकांनी लक्ष घालावे आणि ग्राहकांची लूट थांबवावी.- तेजिंदरसिंह रेणु, महासचिव, विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशन
मॉलमध्ये पार्किंग शुल्क नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:47 AM
स्वत दर, चांगला दर्जा आणि आकर्षक सवलतीच्या नावावर ग्राहकांना मॉलकडे आकर्षिक करण्यात येते. मॉलच्या विविध योजनांकडे आकर्षित होत ग्राहकही तिकडे वळतात.
ठळक मुद्देनागरिकांची लूट थांबावी : ग्राहक संरक्षक कायदे अभ्यासकांचे आवाहन