शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

डोकलाममध्ये कसलाही तणाव नाही, बांधकामविषयक बातम्या या केवळ अफवा; व्ही.के.सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:12 PM

डोकलामनजीक सीमेवर चीनकडून विविध बांधकामे सुरू असल्याची बाब ही केवळ अफवा आहे. डोकलाममध्ये सद्यस्थितीत कुठलेही तणावाचे वातावरण नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह यांनी केला आहे.

ठळक मुद्देदेशातील शिक्षणप्रणालीत बदल हवाअण्णांच्या आंदोलनात जाणार नाहीशिक्षणाचा बाजार थांबला पाहिजे

आॅनलाईन लोकमतनागपूर : डोकलामनजीक सीमेवर चीनकडून विविध बांधकामे सुरू असल्याची बाब ही केवळ अफवा आहे. डोकलाममध्ये सद्यस्थितीत कुठलेही तणावाचे वातावरण नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह यांनी केला आहे. सहाव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे, परिषदेचे ‘पॅट्रन’ देवेंद्र दस्तुरे, निमंत्रक डॉ.मृणालिनी दस्तुरे, रसिका दस्तुरे प्रामुख्याने उपस्थित होते.डोकलाम परिसरातून चीनने माघार घेतली असली तरी सीमेपासून जवळच चीनच्या सैनिकांनी तळ ठोकला आहे. तसेच त्या परिसरात चीनने ४०० मीटर उंचीची भिंत उभारली आहे, अशी माहिती समोर आली होती. यासंदर्भात विचारणा केली असता डोकलाम परिसरात चीनच्या काहीच हालचाली नाहीत. यासंदर्भात पुढे आलेली माहिती, बातम्या तथ्यावर आधारित नसून केवळ अफवा आहेत. त्यामुळे तूर्तास डोकलामवरून कुठल्याही द्विपक्षीय वादाची शक्यता नसल्याचे प्रतिपादन व्ही.के.सिंह यांनी केले.आपल्या देशातील शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासक्रम, पुस्तके अक्षरश: संभ्रम वाढविणारी आहेत. भारताबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यापेक्षा इतर देशातील इतिहास, भौगोलिक-आर्थिक स्थिती यावर जास्त भर देण्यात येतो. या सर्वांची आवश्यकता नाही. अगोदर देशाबाबत विद्यार्थ्यांना कळले पाहिजे, असे व्ही.के.सिंह यांनी स्पष्ट केले. विविध देशातील ‘व्हिसा’ नियम बदलल्याचा फटका भारतीय ‘आयटी’ तज्ज्ञांना बसतो आहे. इतर देशांच्या नियमांवर आपण काही बोलू शकत नाही, मात्र त्यांच्या आर्थिक विकासात मौलिक वाटा उचलणाऱ्या भारतीयांच्या हक्कांच्या रक्षणासाठी मंत्रालय तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षणाचा बाजार थांबला पाहिजेआज शिक्षणप्रणाली हा एक व्यवसाय झाला असून शिक्षण एखाद्या उत्पादनाप्रमाणे विकले जाते. ही बाब अयोग्य आहे. विद्यार्थी व शिक्षकांमधील संवादाचा व आपुलकीचा धागा तुटतो आहे. त्यामुळे मुलांमधील संयमदेखील सुटत चालला आहे. विद्यार्थ्यांमध्ये संयमाची वाढ व्हावी व प्रणालीवरील त्यांचा विश्वास वाढावा यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शिक्षक प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना समजून घ्यावे, असे आवाहन व्ही.के.सिंह यांनी केले.अण्णांच्या आंदोलनात जाणार नाहीसैन्यातून निवृत्त झाल्यानंतर व्ही.के.सिंह यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत विविध राज्यांची यात्रा केली होती. अण्णा हजारे जनलोकपालच्या मुद्यावर परत एकदा आंदोलन करणार आहेत. यावेळी अण्णांच्या आंदोलनात जाणार नसल्याचे व्ही.के.सिंह यांनी स्पष्ट केले. मी आता राजकारणात आहे व राजकारणी व्यक्तीने आंदोलनात समाविष्ट व्हायला नको, अशी अण्णांची अगोदरपासूनची भूमिका आहे, असे सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणDoklamडोकलाम